पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० नाहीं, ही परिक्षा पाहण्याकरितां, चाहावर कांहीं एक कर वसवून तो अमेरिका देशास पाठविला. हा चाहा खालीं उतरावयास न देतां, तशाचा तसाच तेथील लोकांनी परत इंग्लंड देशास पाठविला. बोस्तन बंदरांत त्याची याही- पेक्षां दुर्दशा झाली. तो लोकांनीं गलबतांतून काढून टाकिला. , या दांडगाईकरितां न्यूइंग्लंड प्रांतांतील लोकांचें शा. सन करावयासाठी दोन कायदे ठरले. एक असा कीं बोस्तन बंदर काढावें; आणि दुसरा असा की, कायद्या, प्रमाणे लोकांस वर्तविण्याचा अधिकार तेथील लोकांकडून घेऊन सरकाराजवळ ठेवावा, राजाचा प्रधान यानें मुळा- पासून पार्लमेंट सभेमध्ये मोठा अंमल चालविला होता; परंतु त्या सभेचा समय संपत आला होता; ह्मणून त्यानें विचार केला कीं, नेहमीप्रमाणे नव्या नेमणुकी करण्यावि षयीं जर लोकांस संधि सांपडूं दिली, तर आपले सांगित ल्याप्रमाणे ऐकणारी दुसरी कामन्स सभा मिळणार नाहीं. ह्मणून त्यानें अकस्मात् जुन्या पार्लमेंट सभेस निरोप देऊन नवी तशीच बोलाविली. वर सांगितले की, क्रूर कमें बोस्तन शहरांत झालीं खरी; परंतु बहुतकरून दुसरे सर्व संस्थानांनी लवकरच तसे करण्यास प्रारंभ केला. त्यांचे ध्यानांत आले कों, आह्मी सर्वांनी जरी चाहाचा नाश केला नाहीं, तरी तो ना- कबूल केला, यामुळे वोस्तन शहराचें जें शासन झालें, तेंच आपलें होईल; ह्मणून त्यांनी न्यूइंग्लंड प्रांताचा पक्ष धरण्याचा निश्चय केला; आणि नोवास्कोशिया, वजा- जिया, ही दोन खेरीजकरून बाकीचे सर्व संस्थानांनी,