पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९ किंवा नैर्ऋत्येकडून वाट सांपडेल की नाही, याचा शोध करण्याकरितां पाठविलें. ते भूमध्यरेषेपासून उत्तरेस ८१ अंश ३९ कळांपर्यंत गेले; पुढे बर्फाचे डोंगर किंवा बेटे सांपडूं लागली, त्यामुळे त्याचे जाणे होईना. ते आपलें काम झाल्यावांचून परत देशीं आले. या राज्यांत लोकांस समुद्रांत देश शोधावयाकरित जाण्याची उमेद फार उत्पन्न झाली होती. दक्षिण समु द्रांत देश शोधण्याचे कामासाठी पृथ्वी सभोवत्या पांच वे गवेगळ्या प्रदक्षिणा झाल्या. पहिली, कमोडोर बैरन यानें, दुसरी क्याप्टन वालिस यानें, तिसरी क्याप्टन क्याटि- रेट यानें, आणि चवथी व पांचवी क्याप्टन कुक यानें केली. क्याप्टन कुक यानें तिसरी प्रदक्षिणा करण्याचा- ही उद्योग केला; तेव्हां दक्षिण समुद्रांत नवे सांपडलेलें ओवैही या नांवाचे एके वेटांतील लोकांशी कांहीं तंटा झाल्यामुळे त्यांनी त्यास मारिलें; त्यामुळे सर्व गुणग्राही लो- कांस फार दुःख झालें. इंग्लंड देश व त्याचे ताबेखालचीं अमेरिकन संस्थानें यांमध्ये, त्या वेळेस कर बसविण्याचा अधिकार कोणाकडे, याविषयीं फार तंटा चालू लागला. ब्रिटिश पार्लमेंट यानें आग्रह धरिला की, आपले हुकुमानें त्यांवर कर बस- विण्यास अधिकार आहे. संस्थाने त्या अधिकारास कबूल होईनात. त्यांचें वोलणें पडलें कीं, आमचे संमतावां- चून आह्मांवर कर बसविणें हें योग्य नव्हें; आणि त्यांनीं निश्चय केला कीं, कसौं भयें आलीं, किंवा कसा प्रसंग प डला तरी यावांचून दुसरे रीतीने बसविलेले करांस आपण राजी होणार नाहीं. या निश्चयाप्रमाणे ते करितात किंवा 1