पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ भाऊ प्रिन्स फ्रेडरिक या तिघांनी घेतला, व त्याचे प्री- तीतले स्त्रुएन्सी व ब्रांट या नांवांचे दोघे होते त्यांचा शिरच्छेद केला. इंग्लिश राजाची बहीण माटिल्डा, तेथील राजाची राणी, जीव घेऊन मोठे संकटानें निभा- वली; ती पुढे जर्मनी देशांत झेल शहरांत काही वर्षेपर्यंत होती; आणि पुढे दुख होऊन मृत्यु पावली. या वर्षी ईस्त इंडिया कंपनी यांचे हिंदुस्थानांतील चाकरांचे लोभास प्रतिबंध करण्याकरितां बंगाल्यांत एक न्यायाचे सुप्रीम कोर्ट नेमिलें. त्यांत प्रतिवर्षी ८००० पौंड पगार देऊन एक मुख्य न्यायाधीश, व ६००० पौंड पगार देऊन हाताखालचे तीन न्यायाधीश नेमिले. या वेळेस अयर्लंड व स्काटलंड देशचे उत्तर प्रांतांतील साधारण लोकांस त्याचे निर्दय जामीनदारांनी फार उपद्रव दिला. त्यांनी लोकांस कर देण्याचे सामर्थ्य नाही, असे पाहून जमीनीवर फारच कर बसविला; ह्मणून ते बहुत एकीकडे जमून अमेरिका खंडास निघून गेले; आणि असे सांगतात की, त्या देशांत ज्या फौजेनें लढाईचा प्रारंभ केला, जिनें ती लढाई धीरानें चालविली, आणि आपला नवा मिळविलेला देश स्वतंत्र होइपर्यंत जिनें ती सोडिली नाहीत, तीमध्ये बहुतकरून हे लोक होते. असे आहे कीं, प्रजांवर फार जुलूम केला ह्मगजे त्याच परम वैरी होतात; आणि आपले जुलूमगारांचा सूड उगवावा, अश त्यांस हिंमत उत्पन्न होते, तशी दुसरे देशचे लोकांस हो- त नाहीं. या वर्षी क्याप्टन फिप्स, व क्याप्टन लट्विच, यांस सरकारानें हिंदुस्थानाकडे जाण्यास ईशानीकडून