पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नये, आणि अशा लग्नाचा संस्कार जे कोणी करतील, किं- वा त्या लग्नास मदत करितील, त्या सर्वांचें शासन केले जाईल. या पालेमैट सभेचे बैठकीमध्ये राज्याचे फौजदारी कायद्यांत एक मोठा फेरफार झाला. पूर्वी असे होते की, कोणी फेलन मी अपराधी किंवा नाहीं, हें बोलावयास अमान्य झाला, ह्मणजे त्याची पाठ जमिनीवरून ओढून छातीवर भार ठेवावा, तो मरेपर्यंत तो भार हळू हळू वाढ- वावा, आणि त्यास एक भाकरीचा तुकडा आणि चिखला- चे पाणी इतकें मात्र द्यावें. आतां ही वाईट चाल मोडून असा कायदा झाला कीं, कोणी उत्तर न दिलें, तर त्यावर जो आरोप असेल तो खरा असे समजावें. या वर्षी युरोप खंडांतील तीन राजांनी फार अन्याय- कर्म केलें. जर्मनी देशचा एंपरर, प्रशिया देशचा राजा, आणि रशिया देशची एंप्रेस या तिघांनी एक मसलत करून पोलंड मुलुखांवर आपला जुना दावा आहे, अशा निमित्तानें त्या देशाच्या लागवडीचा जो अंश होता तो वाटून घेतला; आणि बाकीचा भाग स्वतंत्र राज्य, असे करून पूर्वी तेथें राजा नेमावा, अशी चाल होती, ती मोडून तेथील राजानें वंशपरंपरेनें तें भोगावें असे केले. या त्यांचे उद्योगास युरोप खंडांतील कोणी दुसरे सरकारांनी विध केले नाहीं, ह्मणून तो सिद्धीस गेला. तसेच त्या वर्षी स्वीड्न देशांतील राजानें राज्यपदावर बसण्याचे समयीं धर्मानें करार केला होता तो मोडून, आपण परतंत्र होता, तो स- वींपेक्षां स्वेच्छाचारी झाला. डेन्मार्क देशांतील राजाचा सर्व अधिकार त्याची सासू, विधवा राणी, व त्याचा सावत्र