पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ताची जागा काईम झाल्याशिवाय मी येणार नाहीं. हा शेवटचा गृहस्थ सांपडावयाचा उपाय कामन्स यांजवळ कांहीं नव्हता, ह्मणून त्यांनी पूर्वीचे दोघांचें मात्र शासन केले. ते हें कीं, त्यांस किल्ल्यांवर सेशन संपेपर्यंत बं दींस ठेविलें. या वर्षी हिंदुस्थानांत एक मोठा दुष्काळ पडला. त्या- मुळे तेथील लोकांतून एक तृतीयांश जे एक कोट लोक मेले. आपले शास्त्राप्रमाणे सादेशचे लोक मांसा- दिक खात नाहींत, तांदूळ मात्र खातात. ते तांदूळ व हुतकरून सगळे कंपनी सरकारचे चाकर खरेदी करून, असे मोठे किमतीनें विकूं लागले कीं, गरीब लोकांस ते घे- ण्याची शक्ति अगदीं नव्हती. ज्या राज्यांत राजास प्रजांचे संमतानें नेमितात, तेथें राजाचे तक्त रिकामें झालें ह्मणजे फारकरून मोठमोठ्या मारामारी आणि दंगे होतात. ह्मणून युरोप खंडांतील बहुतकरून सर्व राज्यांत वंशपरंपरेनें राज्य चालवावें, असे ठराव झाले आहेत; तथापि तशा ठिकाणींही अधिकारावि- षयीं तंटा पडला, ह्मणजे आंतले आंत लढाया होऊन रक्तें पडतात, ह्मणून अधिकाराच्या अनुक्रमाविषयी फार बंदोब- स्त करावा लागतो. याकरितां इंग्लंड देशचे राजाचे कुटुंबांत लमें होण्याचा इतका बंदोबस्त आहे. दोन भाऊ ड्युक ग्लोस्तर व ड्युक कंबर्लंड यांनीं गुप्त- पणे लग्नें केली. पहिला यानें कौंटेस वाल्व इशीं आणि दुसऱ्याने लार्ड इर्नम याचे विधवा मुलीशीं केलें. ह्मणून असा कायदा ठरला की, सरकारी मोहोर होऊन हुकूम झाल्यावांचून राजाचे कुटुंबांतील कोणी लग्न करूं राजाचे