पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लोक, आणि एक कोटि ऐशों लक्ष लिवर* इतका खर्च झाला. बहुत लोकांचे मनांत होते की, फ्रेंच लोकांचे राज्य वाढण्यास इंग्लिश यांनी विघ्न करावें; परंतु ते अमेरिकन लोकांशीं लढाई करण्याचे कामास लागले होते, ह्मणून त्यांनी कांहीं तो उद्योग केला नाहीं. पुढे लंडन शहरांत असे झाले की, कामन्स सभेचा एक शिपाई, सभासदांची भाषणे कोणी एके छापणारानें प्रसिद्ध केलीं, ह्मणून त्यास धराव- यास शहरांत गेला. त्या छापणारानें एक इ०स० १७७१ कानस्तेबल यास बोलावून आणिलें, आणि त्यानें त्या दो- घांसही लार्ड मेयर कास्बि याजवळ नेलें. तो कास्त्रि साहेब, व अल्डमन विल्क्स आणि आलिवर यांनी मिळून त्या छापणारास सोडून दिले, आणि प्राजिस्क्रेट याचें हुकुमावांचून आपणास धरण्याचे कारण काय, असे त्या छापणाराचे फिर्यादीचा जात्र देण्याकरितां जामीन द्यावा, असा शिपायास हुकूम केला. तो त्यानें प्रथम- कबूल केला नाहीं; परंतु त्यांनी त्यास बंदीत ठेवण्याचे ढुकुमावर सही केली, ह्मणून त्याने जामीन दिला. असा आपले सत्तेचा तिरस्कार केला, असे वाटून कामन्स यांस राग आला; आणि त्यांनीं ते दोन आल्डमैन व मेयर यांस हजीर होण्याची आज्ञा केली. कास्वि व आलिवर साहेब यांस त्या सभेत जागा होत्या, ह्मणून ते आले; परंतु विल्क्स साहेब लागला की, माझी मिडल्सेक्स प्रां.

  • लिवर ह्मणून फ्रान्स देशांत एक नाणें आहे, त्याची किंमत सु

मारें अर्ध रुपया आहे. १८