पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ विल साहेबाचे सांगण्यावरून असा कायदा ठरला कीं, अशे तंट्यांचा विचार तेरा आसामींनीं ठरवावा, आणि ते असामी दैवानें ज्यांची नेमणूक होईल असे असावे. कायदा केल्यापासून पक्षपाताचा संशय वास्तवीक कधींही हा झाला नाहीं. सांप्रतचे प्रधानाचीं प्रथम लार्ड चाथम यानें राजा- जवळ शिफारस केली होती, आणि तेही काही वेळपर्यंत त्याचे मसलतीनें चालत असत; परंतु पुढे ते त्यास पूर्वी- सारिखे विचारीनात असे झाले; ह्मणून लार्ड चाथम यानें आपली प्रधानाची जागा सोडून दिली. तीवर पुढे अर्ल वि स्तल याची नेमणूक झाली. नंतर डयूक ग्राफ्टन याचे मुख्य प्रधानाचे जागेवर लार्ड नार्थ याची नेमणूक झाली. या रीतीनें जुने प्रधान जाऊन नवे झाले; त्यांनीं अमे रिका देशांत कांहीं गरज नसतां लढाई आरंभिली; ती शाहाणपणावांचून आणि धीरावांचून चालविली; आणि शे- वटी फार अप्रतिष्ठा आणि तोटा होऊन संपविली. पूर्वी स्वदेशांतील कारभार चालविण्यांत प्रधानांनी जसा भित्रेपणा दाखविला होता, तसा ते आतां बाहेरचे राज्य नीतीने करूं लागले. त्यांनीं मेदितरेनियन समुद्रांत एक कार्सिका ह्मणून वेट आहे, ते फ्रेंच लोकांस घेऊन दिले. तें बेट पूर्वी जिनोईस लोकांजवळ होते; परंतु त्यांनी क्रूर- पणा केल्यामुळे तेथील लोकांनी बंड करून त्यांची सत्ता नाहीं अशी करून आपला देश स्वतंत्र केला. ह्मणून जि- नोईस लोकांनीं तें फ्रेंच यांचे धीन केले, आणि त्यांनीं तें लागलेच घेतलें, परंतु त्या लढाईत त्यांचे दाहा हजार