पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ कामन्स सभेत लत्रल साहेबाकडे अधिक संमतें पडून तोच मुकरर झाला. • या गोष्टीपासून राज्याचे स्वतंत्रपणाचा फार नाश हो- ईल, असे लोकांस वाटू लागले. इतके दिवसपर्यंत या नेम- णुकीचा विल्क्स साहेब, व त्याचे शत्रु यांशीं मात्र संबंध होता; परंतु आतां तीपासून सर्वांस भय पडलें कीं, या नेमणुकीपासून आमचे हक्क बुडाले. यामुळे प्रथम अर्ज्या, आणि पुढे फिर्यादी राज्यांतील सर्व प्रांतांतून येऊं लागल्या. त्यांतून कित्येक मोठे धीराने आणि कित्येक दांडगेपणानें लिहिलेल्या होत्या. यांनीं विनंती केली कीं, पार्लमेंट स- भेस निरोप द्यावा; आणि स्पष्ट लिहिले की, ही पार्लमेंट सभा कायद्याप्रमाणे नव्हे. असे तेव्हां सरकार मोठे संकटांत पडले. त्याने लो- कांस अशा अर्ज्या करावयासारिख्या गोष्टी करूं नये हो- सा, आणि केल्या तर लोकांचे उद्धतपणासाठी शासन करावयाचें होतें. परंतु यास इतकी हिंमत झाली नाहीं; आणि त्याचे अशे भित्रेपणामुळे लोकांमध्ये राज्याचा तिर- स्कार उत्पन्न झाला; आणि त्याचें फळ लवकरच असें आले की, बाहेरचे लोक इंग्लिश सरकारासफार मानितात असे झाले, आणि अमेरिकन लोकांनींही सरकारचे भय सोडिलें. या वर्षी पार्लमेंट सभेतील लोकांचे नेमणुकीसंबंधी तंत्र्याचा कामन्स यांचे सभेत विचार होण्याची जी रीति होती, तिच्या वस्ताकरितां एक मोठा कायदा झाला. पूर्वी या तंट्यांचा विचार सर्व सभा करीत असे, आणि फारकरून प्रधानांचा पक्ष सिद्धीस जाई; परंतु आतां ग्रा.