पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ सभेत नेण्याकरितां लोक जमले. तेथें लवकरच सरी प्रांतांतील न्यायाधीश आले, आणि त्यांनीं रयट * आक्ट वाचिलें, परंतु लोक जाईनात ह्मणून फौजेस बोलावून बं दुका चालू करण्याचा हुकूम केला, कित्येकांस थोडी दु- खापत झाली, दोघां तिघांस मरावयासारिखी झाली; व एक तेथेंच ठार मेला. या कामांत त्यांनीं धीरानें वर्तणूक केली, ह्मणून सरकारचा सेक्रतारी लार्ड वेमौथ यानें त्या न्यायाधीशांस स्तुतिपत्रे पाठविलीं. विल्क्स साहेबानें तें सर्व वर्तमान पाहून त्या प्रसंगी प्रधानाची फार निंदा केली; त्यानें पुढे लार्ड वेमौथ याचें पत्र आणि त्यावर आपण कांहीं लिहून प्रसिद्ध केले; त्यांत वंदिखान्याजवळ जी गोष्ट घडली, ती वास्तवीक खूण असे लिहिले. या कारणामुळे. त्यास पार्लमेंट सर्भेतून काढिले. मिड्ल्सेक्स प्रांताचे लोकांनी फिरून त्यास सर्व संमतानें नेमिलें. नेमणूक रद्द करून फिरून हुकूम पाठविला. लोकांनी फिरूनही आग्रहाने सर्व संमत होऊन त्यासच नेमिलें. तीही नेम- णूक पार्लमेंट सभेनें रद्द केली, आणि या रीतीनें लोकांचें नेमणे व पार्लमेंट सभेचें रद्द करणें नेहमी न चालावें, या- करितां लार्ड इर्नम याचा मुलगा कर्नल लत्रल याकडून पार्लमेंट सभेतील जागा सोडवून त्या प्रांताचे जागेसाठीं प्रयत्न करविला. त्याकडे २९६ लोकांची समतें पडलीं, आणि विलक्स साहेवाकडे ११४३ लोकांचीं पडलीं, तरी लोकांच्या बंद होण्यासाठी सरकारी फौज वगैरे जाते- तिनें लो- कांवर गोळी मारण्याचे पूर्वी सरकारी कामगार, लोकांनी आपापले घरों जाण्यासाठी जो कायदा वाचतात तो.