पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ एक युक्ति काढिली. मग दुसरे पार्लमेंट याची संभा केली; आणि पूर्वी कामन्स यांचे सभेत जे प्रजेचा पक्ष घेऊन राजास प्रतिकूळ बोलत होते, त्यांस प्रांतोप्रांतींचे शरीफ करून सभेतून काढिले; तथापि त्यांचे ठिकाण दुसरे जे नवे केले, ते त्यांपेक्षा अधिक आग्रह धरूं लागले. जेव्हां राजाने त्यांस कळविले की, आपल्यास द्रव्याची गरज लागली आहे, तेव्हां त्यांनी त्यास तीन वेळ द्रव्य दिले, तें सर्व मिळून एक लक्ष साठ हजार पौंड झाले; इतकें द्रव्य त्याचे उद्योगास फार कमती होते. मग पुष्कळ द्रव्य काढावयाकरितां नियय केला कीं, रोमन क्याथो- लिक लोकांस प्रतिबंधकारक जे पूर्वीचे कायदे आहेत ते मोडावे. मग तो चार्लस राजा, राज्यांतील कुलीन सभा- सद लोकांकडून पैका कर्ज काढू लागला; परंतु तशा रितीनें बहुत एकदांच हातास येईना. ह्मणून या सर्व गोष्टीं टाकून राजानें गांवांवर गलबतांचा कर बसविला. तो असा. राजानें हुकूम करावा कीं, अमुक बंदरांतून इतकी गलबतें लढायास सिद्धकरून पाठवून द्यावीं; ह्मणजे त्या आज्ञेप्रमाणे जवळचे गांवाची मदत घेऊन त्या बंदरचे लोकांनी तितकी पाठवून द्यावी. लंडन शहरावर वीस या रितीनें हा जो कर बसविला, तो शेवटीं फार वाढून त्यापासून मोठा अनर्थ झाला. कांही दिवसांनंतर फ्रेंच यांशी युद्ध करावे, असा नि- श्चय ठरला; ह्मणून डयुक बकिंगम यांजवळ बहुत गलबतें देऊन त्यास रोशेल शहर घ्यावयाकरितां पाठविलें. हें शहर फ्रेंच यांचे मुलुखांतले खरे; परंतु कांहीं दिवस- पर्यंत तेथून त्यांचा अंमल निघाला होता; आणि त्या शह- गलबतांचा कर बसला.