पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जो तंटा होता, तो नवीं नवीं कारणे होऊन वाढत चालिला. त्या वेळेस नुकतेंच पार्लमेंट सभेचे हुकुमावरून असे ठरलें होतें कीं, इंग्लंड देशांतून अमेरिका देशांतील बंदरांत, कांच, कागद, वगैरे जो जिन्नस जाईल त्यावर कांहीं हक्क बसवावा; आणि तो घेण्याकरितां सर्व बंदरांत चौक्या ठे- विल्या होत्या. या रीतीनें आपला स्वतंत्रपणा जाऊं ला- गला असे समजून अमेरिकन लोकांनी पूर्वी जसा कर बंद होईपर्यंत इंग्लिश जिन्नस देशांत खर्चू नये, असा आंतून निश्चय केला होता, तसा आतां उघड केला. हें सिद्धीस जाण्याकरितां बोस्तन शहरचे सभेनें इतर सभांस पत्रे पा- ठविलीं कीं, सर्वांच्या मसलती एकसारिख्याच असाव्या. या कृत्याकरितां बोस्तन शहरचे सभेस निरोप दिला, आ- णि दुसरी सभा नेमिली; परंतु तिचाही तसाच आग्रह पाहून तिलाही निरोप दिला. त्या जकातीचे कारभारी, यांस लोकांनी इतका उपद्रव केला कीं, ते शहर सोडून फोर्ट विलियम किल्यावर जाऊन राहिले. सारांश, वोस्तन शहरांतील लोकांस इतका संताप आला की, हा- लिफाक्स शहराहून पायदळाच्या दोन पलटणी, व तित- क्याच अयर्लंड देशांतून तिकडे पाठविणें जरूर पडलें. तेव्हां एशिया खंडांतही नवेंच वर्तमान घडलें. अली ह्मणून • कोणी शिपायाचे पायरीपासून चढून राजा झाला होता, त्यानें कंपनी सरकाराशी लढाया आरंभिल्या, आणि जुने सर्व नबाबांपेक्षा त्यांस फार उपद्रव दिला. हैदर अशीं बाहेर वर्तमानें घडत असतां, इंग्लंड देशांत नवे पार्लमेंट सभेचे वेळेस विल्क्स साहेब इतरांप्रमाणे सभेत बसेल, असे समजून तो बंदींत होता, तेथून कामन्स यांचे .