पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपण स्वये आला; ह्मणून कोर्ट यानें आपला पूर्वीचा हुकूम फिरविला. आणि त्याने दोन वर्षेपर्यंत कैदेत राहावे, आणि एक हजार पौंड दंड द्यावा असे ठरविले. त्याने रा: ज्याचे स्वतंत्रतेसाठी शासन सोसलें; असे समजून लंडन शहरांतील कांही व्यापाऱ्यांनी त्याचा दंड देण्याकरितां, व कैदेत त्याचा निर्वाह होण्याकरितां, आणि त्यास सुमारें वीस हजार पौंड़ कर्ज होते, त्याची तोड करण्याकरितां, एक टीप केली; आणि शेवटीं हीं सर्व कामे घडून आली. ही मिड्ल्सेक्स प्रांतांतील नेमणूक व तीपासून जो पुढे द्वेष वाढला तो, अमेरिका देशांत लढाई होण्यास थोडा बहुत कारण झाला; त्यापासून राज्यासंबंधी वर्तमा- नांत उलटपालट झाली; प्रधानांत अकस्मात् फेरफार पडूं लागला; कधीं व्हावयाचे नव्हत असे विचार होऊं लागले, इंग्लिश यांची आतले आंत फूट पडूं लागली; आणि लोकांची सरकारावर प्रीति नाही अशी झाली. ही संधी पाहून त्या सरकारचे ताबेंतील संस्थाने बाहेर देशांत होती, त्यांनी नवे हक्क आणि सत्ता मागण्याचा आरंभ केला. पूर्वी या वर्षी लोकांस शिल्प, मूर्ति कोरण्याची विद्या, आ- णि चित्र काढणें, हीं शिकविण्याकरितां राजानें रायल आ क्याडेमी या नांवाची मोठी शाळा उत्पन्न केली. बहुत दिवसांपासून कारागीर लोकांनी अशी एक मंडळी केली होती, आणि त्या त्या कळा पूर्णपणास आणिल्या होत्या; ह्मणून या नवे मंडळीपासून दुसरे कांही झाले नाहीं; कारागिरांत पक्ष मात्र पडले, परंतु त्या दोन शाळा शेवटी एक झाल्या. ब्रिटन आणि अमेरिका देशांतील संस्थाने यांमध्ये