पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ह्मणून त्या लोकांस त्रास उत्पन्न होऊन ते सर्व एकत्र मि छून इंग्लिश लोकांस बाहेर काढून देतील, असें भय उ त्पन्न झालें. यास उपाय करावयाकरितां लार्ड क्लेव यास हिंदुस्थानांत पाठविले, आणि त्याणें लवकरच मोंगलाशीं तह करून कंपनी सरकारास रोकड सत्रा लक्ष पौंड वसूल यावा असे केलें. त्याणेही आपण बहुत पैका मिळविला, परंतु आपले मुलुखाची मोठी चाकरी तरी केली. पार्लमेंट सभेनें हुकूम केला कीं, बादशाही फौजेस सामानाचा पुरावा अमेरिका देशांतील संस्थानांनी करावा, हा हुकूम न्यूयार्क संस्थानानें ऐकिला नाहीं, ह्मणून पार्ल- मेंट सभेने दुसरा हुकूम केला की, पहिल्या ढुकुमाप्रमाणे वर्तणूक झाल्याचे पूर्वी त्या प्रांतांतील सभेनें नवे कायदे करूं नये. या प्रतिबंधास मान्य न होऊन अमेरिकन लो 'कांनी इंग्लंड देशांतून माल आपले देशांत येऊं नये; ह्मणून कानू करण्याचा आरंभ केला. त्या पार्लमेंट सभेचा नेमलेला वेळ संपला, ह्मणून तीस निरोप देऊन दुसरी करण्यासाठी प्रांतोप्रांत हुकूम गेले. तेव्हां कांहीं गडबड न होतां सगळे प्रांतांत नेमणूकी झाल्या. प्रेस्तन प्रांतांत व आणखी कांहीं ठिकाणी मात्र लोकांनी कांहीं दांडगाई केली. संन् १७६३ वे वर्षी विलक्स साहेब ज्यास औटला असे प्रसिद्ध केले होतें, तो तेव्हांपासून बाहेर देशांत होता; त्यानें आतां परत येऊन मिडलसेक्स प्रांतांतील सभासदाचे जागेसाठीं यत्न केला, त्याविषयी बहुत लोकांचे संमत पडून त्यास नेमिलें. या री तीनें पार्लमेंट सभेत जागा मिळाल्यावर. ज्याने आपणास औट्ला असे केले होते, तें किंग्स बेंचकोर्ट यासमोर तो