पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ त्या वेळेस लोकांमध्ये पक्षपात फार झाल्यामुळे एक मोठा तोटा झाला. तो हा कीं, वारंवार प्रधान आणि राज्य मसलती यांमध्ये फेरफार होऊं लागले. त्यामुळे बाहेरची राज्ये इंग्लिश लोकांशी तह करण्यास राजी होईनात; क राज्यांतील लहान पदवीचे लोक सरकारास मानीनात असें झालें. ही गोष्ट राज्य चांगले चालण्यास फार विघ्न क रिते. असे फेर होण्याचे रीतीप्रमाणे ग्राश्विल साहेबाचे जागेवर राकिंगम एथील मार्कइस यास प्रधान नेमिलें, तो मनाचा स्वच्छ, निर्लोभी, आपले देशाचें वरें इच्छिणारा, आणि मध्यम बुद्धीचा होता. या नवे प्रधानांनी पूर्वीचे प्रधानांनी जें काय केले होते ते मोडलें, आणि त्यांनी केले होते ते त्यांचे पुढले प्रधानांनी मोडलें, बहुत व मोठीं वर्तमानें घडलीं नाहींत. पंपरर मेला, त्याचे जागेवर पुढे प्रिन्स जोझप राज्य करूं लागला. फ्रान्स एथील प्रिन्स, इंग्लिश राजाचा चुलता कंबर्लंड याचा डयुक, त्याचा लहान भाऊ प्रिन्स विलियम फ्रेदरिक, हे व ह्यातारा प्प्रिटेंडर रूम शहरांत सत्याहत्तरावे वर्षी मरण पावला. नेहमीप्रमाणें नवें वर्ष लागतांच नवे प्रधान इ०स० झाले. मार्कुइस राकिंगम याच्या जागेवर ड्युक ग्राफ्टन नेमिला. राज्याचें मोरतव पिंट साहेबाचे स्वाधीन केलें, आणि त्यास अर्ह चायम असा किताब दिला. या वर्षांत कांही जर्मनी देशचा या वर्षी हिंदुस्थानांत कंपनी सरकारचे राज्यांत त्यांचे चाकरांचे लोभामुळे फार धांदल झाली होती. ते नजर या नांवानें तेथील राजांपासून बहुत पैका घेऊं लागले,