पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

19 प्रसिद्ध केलें; त्यामुळे आपणास राज्याचा सेकतारी याने निष्कारण बंदीत ठेविले ह्मणून त्याची फिर्याद होती, ती रद्द झाली. असा प्रधान आणि विलक्स साहेब यांमध्यें तंटा झाला. त्यापासून पार्लमेंट समेत असे ठरलें कीं, जन- रल वारंट हीं कायद्याप्रमाणे नाहीत; आणि पुढे कोणास धरून आणणे आसल्यास वारंट यांत त्याचे नांव लिहिलें पाहिजे. त्या वर्षी राजाची वडील वहीण प्रिन्सेस आ- गस्टा इचें आणि ब्रन्सविक प्रांताचा प्रिन्स याचें लग्न' झाले. दुसरे बाहेरचे देशांत या वर्षी कांहीं मोठ्या गोष्टी झा- ल्या नाहींत. कौंट पोन्याटौस्की ह्मणून पोलंड देशां- तील राहणारा होता, त्यास त्या राज्यांतील राजा नेमिलें. पूर्वी संन् १७३९ त रुशिया देशचे सिंहासनावर इवान किंवा ज्ञान या नांवाचा कोणी पुरुष वसला होता, त्यास, तेथून लवकरच काढून बंदींत ठेविलें होतें, त्यास रखवाली लोकांनी मारिलें. सुमारे चाळीस इंग्लिश लोकांस हिंदु- स्थानांत बंगालचा पदच्युत सुभेदार काशीम अल्लीखान याचे आज्ञेनें, व कंपनी सरकारचे फौजेंतून सोमर्स या नांवाचा कोणी पळून गेला होता त्याचे हातानें मारिलें. दुसरे वर्षीचे प्रारंभी कांहीं वर्तमान घडले, त्यापासून युरोप व उत्तर अमेरिका या देशांचा फारनाश झाला. तें वर्तमान हें कीं, अमेरिका देशांतील इंग्लिश १७६५ संस्थानावर स्टांप आक्ट ह्मणून कर बसविला; परंतु तो त्यांनी सर्व संमतानें मान्य केला नाहीं, व दुसरे सेशन यांत रद्द झाला असतांही त्यांस त्याचा विसर पडला इ०स० नाहीं.