पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब्रिटिश सरकारास लरिडा प्रांत दिला. दुसरी क्यानडा, केप ब्रिटन, टोबेगो, डोमिनिका, सेंटविन्सेट, ग्रीनेडास, व आफ्रिका खंडाचे कांठावरील सिनिगाल, इतकी ठेऊन बाकीचा जो मुलूख घेतला होता, तो परत दिला. पुढे लवकरच हंगरी देशची राणी व प्रशिया एथील राजा यांचाही सल्ला झाला; आणि सर्व युरोप खंडांत पुनः स्वस्थता झाली. लढाई संपली तेव्हां इंग्लि- श सरकारास चवदा कोटि ऐशीं लक्ष कर्ज होतें, व त्याचें व्याज दरवर्षास पन्नास लाख पौंड होत असे.

लार्ड ब्यूट याची नेमणूक झाली तेव्हां प्रथमच ती पक्ष- पाताने झाली असा बोभाट झाला होता; आणि तो वाढतां वाढतां शेवटी सैडर (मद्याचा एक प्रकार) यावर कर बस- विला, त्यामुळे त्याचा नाश झाला. त्याने आपली जागा एप्रिल महिन्यांत सोडिली; व त्या जागेवर पुढे जार्ज ग्रान्विल साहेबाची नेमणूक झाली. पुढे शस्त्रांची लढाई बंद हो- ऊन लिहिण्याची लढाई चालू झाली. राजास विरुद्ध जे त्या वेळेस कागद वगैरे छापिले गेले, यांत नार्थ ब्रिटन या नांवाचे एक वर्तमान पत्र विल्क्स साहेब छापीत असें, त्याचे ४५ वे कागदांत त्यानें राजानें पार्लमेंट सभेत भा- षण केले, त्याची फार निंदा केली होती. त्यावरून त्यास व छापणारांस धरून चौकशी झाली, आणि कामन्स समेत असे ठरलें कीं, नार्थ ब्रिटन याचा ४५ वा कागद लबाड, फितूरी, व खोटा असा आहे. पुढे त्यास जान्यु- आरी महिन्यांत कामन्स समेतून काढून दिले; आणि कांहीं फिर्यादीचे जाब देण्याकरितां वोला- वर्णे केलें, तेव्हां तो आला नाहीं, ह्मणून तो औला असे इ०स० १७६४ .