पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऊन प्रशिया देशचे राजाकडची आपली फौज परत आणविली; परंतु त्याशीं पुनः लढाई चालू केली नाहीं. या रीतीनें त्या राजाचा एक मोठा शत्रु गेल्यावर बाकीच्यां- चें निवारण करावयास त्यास अधिक सामर्थ्य आले. ही लढाई फार चांगली सिद्धीस गेली, व इंग्लिश यां- ची तीपासून कीर्तिही झाली. सात वर्षांत सर्व उत्तर अमेरिका देश ग्रेट ब्रिटन याचे ताबेखाली आला. पंच- बीस मोठीं व उपयोगी ठिकाणची बेटे स्वाधीन झालीं; समुद्र व जमीन यांतून वारा लढायांत जय झाला; सुमारें पन्नास किले व शहरें हाताखालीं आलीं; शत्रूंची लढाऊ जहाजे शंभरांवर घेतलीं व मोडलीं, व एक कोटी वीस लाख पौंड लुट सांपडली. इतका चढाव झाला असतां- ही ब्रिटन देशचे सरकारचे मनांतून तह न करावा असे नव्हते. अमेरिका एथील संस्थानें निर्भय व्हावी ह्मणून ही लढाई आरंभिली होती, ती गोष्ट चांगली सिद्धीस गेली. ब्रिटिश सरकारास पैका बहुत उत्पन्न होत असे खरा; परंतु खर्च त्यापेक्षा अधिक होई, व लोक मिळावयास फार पैका पडत असे. दुसरे लढाई करणारे सरकारासही तह करण्याचें जरूर झालें. फ्रेंच यांचें सारे अरमार नाहींसें झाले; व राज्यांतील पैका आणि लोक गेले. स्पानिश स- रकारास भय उत्पन्न झाले की, पुढे लढाई चालिली अस- तां आपला नाश होईल; व पोर्टुगल देशाचा फार नाश झाला होता; या कारणामुळे सर्वांचे मनांत तह करावा असे झालें; व हाचे बोलणें पारीस शहरांत चालू इ०स० झालें; कांहीं बोलणीं होऊन शेवटीं फेब्रुअरी १७६१ महिन्याचे १ तारिखेस तह ठरला. हावाना याबद्दल