पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ परंतु त्याचा स्वभाव भला नव्हता; जो स्वभाव आसल्या- वांचून इंग्लंड देशांतील प्रधानावर लोकांची प्रीति असत नाहीं. तो विद्वान होता, ह्मणून जर त्यानें पूर्वीची जागा सोडिली नसती तर विद्वानास आश्रय दिल्याने त्याची कीर्ति झाली असती; परंतु तो राज्यकारभारांत पडल्या- मुळे त्यांत अडचण पडली, आणि राजावर लोकांची प्रीति कांही कमी झाली. तथापि लढाया पूर्वीसारिख्याच निकराने चालिल्या होत्या. स्पेन देशचे संस्थानांवर दोन लढाया आरंभि ल्या. एक मेक्सिको प्रांताजवळचे समुद्रांत हावाना बंदरावर; व दुसरी पूर्वेस मानिला शहरावर. त्या दो- होतही इंग्लिश यांचा जय झाला. पहिले लढाईंतील लुटीची किंमत तीस लाख पौंड झाली; दुसरे ठिकाण दहा लाख पौंड द्यावयाचे करून स्पानिश यांनी सोड- विले; परंतु तो पैका कधी दिला नाहीं. त्या वेळेस इंग्लि शयांचा साथी प्रशिया देशचा राजा होता, त्यानें त्या लढाईत कीर्ति राहावयाजोगा पराक्रम केला, त्यास कांहीं दिवस शत्रूंचे उपद्रवापासून फार भय झाले होते; परंतु दैववशांत कांहीं गोष्ट घडून त्याचा निभाव लागला. तो गोष्ट अशी. रशिया देशची राणी इलिझाबेथ मेली, आणि त्या देशांत तिचा पुतण्या तिसरा पीटर राजा झा ला. त्याने प्रशिया देशचें राजाशीं तह करून त्यास शत्रूशी लढाई करण्यास मदत केली; परंतु या कृत्यानें प्रजांचा रोष त्यावर झाल्यामुळे तो पदच्युत होऊन वंदीस पडला; व लवकरच मेला. त्यानंतर त्याची बायको रा- ज्य करूं लागली, तिनें आपले नवन्याचा बेत सोडून दे-