पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ ला, तेव्हां त्याची कांहीं खातर झाली नाहीं, ह्मणून तो वकील निरोप न घेतां तेथून निघून आला. पुढे जुने पार्लमेंट सभेस निरोप होऊन नवी सभा झाली; तींत असें ठरलें कीं, राणी जर राजाचे मागें वां- चली, तर तिला १००००० पौंड नेमणूक व सामसेंट वाडा द्यावा. पुढे त्या वाड्याचा व बकिंगम हौस यांच्या बदला केल्या. पुढलें वर्षाचा पुरावा त्या वर्षाचे पुराव्या- पेक्षां दहा लक्ष पौंड कमी झाला. पिट साहेबानें काम सोडिलें, तंवपर्यंत प्रधान पूर्वीचे राज्याचे शेवटीं जसे होते तसेच होते. राज्याचे प्रीतींत- ला लार्ड ब्यूट यास अल होल्डनेंस याचे जागेवर रा- ज्याचा सेक्रतारी नेमिलें होतें. परंतु पुढे पेलम वंश फार समर्थ झाला, हे समजून अशी युक्ती केली की, डयुक न्यूक्यास्तिल यास आपली प्रधानाची जागा सोडावी लाग- ली. मग त्या जागेवर लार्ड ब्यूट याची नेमणूक झाली.या दोघांचे पक्षपाती लोकांमध्ये त्यामुळे फार द्वेष वाढत चालिला. ड्युक न्यूक्यास्तिल यामध्ये मोठे गूण कोणते नव्हते; परंतु तो स्वच्छ मनाचा, उदार, निष्पक्षपाति, दाता, असा होता; त्यानें आपणाकरितां व आपले कुटुंबाकरितां नेमणुकी व जागा मिळवून ठेविल्या नाहीत; आणि रा जाची प्रतिष्ठा व राज्याची शोभा राहाण्याकरितां आपली संपत्ति भरीस घातली. त्यास काम सोडिल्यानंतर ने- मणूक करून देऊं लागले, तेव्हां त्यानें उत्तर केलें कीं, आपले देशाकरितां मी माझी एवढी संपत्ति खर्च करून आतां लोकांवर भार घालणार नाहीं. इकडे लार्ड ब्यूट यामध्ये गूण व चांगली बुद्धि होती; १७