पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाड्या यांचा शोध करूं लागला. त्याचे लक्षांत होते कीं, स्पानिश सरकारानें पूर्वी फ्रेंच लोकांविषयीं उदासी- नपणा राखणे कबूल केले होते, तरी त्याचा तिकडे पक्ष आहे. पुढे त्यास गुप्त बातमीदारांचे द्वारें शोध लागला कीं, फ्रेंच सरकार व स्पानिश सरकार यांचा तह झाला; आणि यावरून त्याचे लक्षांत आले कीं, ते लवकरच इंग्लि- श लोकांशी युद्ध करण्याची उघड प्रतिज्ञा करितील. ह्मणून त्यानें बेत केला की, जर स्पानिश सरकारानें इं- ग्लिश यांची खातरी केली नाहीं, तर त्यांचे अरमार घ्यावें, किंवा दुसरा कांहीं त्यांचा नाश करावा; ह्मणून आपण मेदितरेनियन समुद्रांत अरमार पाठवावें. पिट साहे- बाचा इतर प्रधानांशी द्वेष होता, आणि त्याचे तेजाखालीं राज्यांतील मोठे मोठे जुने मातबर कुटुंबांचा मान कमी होत चालिला होता, ह्मणून अलं टेंपल यावांचून इतर सर्व प्रधानांनी हा बेत चालू दिला नाही. यामुळे पिट साहेब अल टेंपल यांनी आपली कामें सोडिली. पिट सा- हेबानें सरकारचें काम चांगले केलें, ह्मणून त्यास तीन पिढ्यांपावेतों ३००० पौंड वर्षास नेमणूक करून दिली, व त्याचे बायकोस बारोनेस चाथम असा किताब मिळाला. पिट साहेबानें काम सोडिल्यानंतर कांहीं महिन्यांनी कळू आलें कीं, याचे मनांतील संशय खरे होते, हे कळावयास कारण असे झालें कीं, स्पानिश दरबारांतील इंग्लिश वकील अल ब्रिस्तल यानें, ज्या वेळेस त्यांचा आणि फ्रेंच यांचा आंतून तह झाला, तो पहावयासाठी व फ्रेंच यांस त्या लढाईंत मदत करावयाविषयीं स्पानिश यांचे मनांत काय आहे हे कळण्यासाठी यत्न आरंभि