पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५ प्रकरण २८. प्रथम चार्लस राजाची कथा. संन् १६२५ पासून १६४८ पर्यंत. राजा चार्लस जेव्हां राज्य करूं लागला, त्या वेळेस त्यास सर्व गोष्टी चांगल्या अनुकूळ होत्या. असे असतां त्यानें जी पुढे दुःखें भोगिलीं तशीं कोणीच भोगिलों नाहींत. प्रथम त्यांस असे वाटले की, माझ्यावर लोकांची प्रीति आहे, त्या अर्थी मी जे करीन तें निर्विघ्नपणे सिद्धीस जाईल. चार्लस याचा मेहुणा प्रिन्स पालेटैन त्यास राखावा; आणि त्याकरितां लढाई चालू झाली होती, ती या राज्यांत पुढे चालवावी, असे पूर्वी ठरलेले होते; परंतु खर्चाचा विचार येऊन कामन्स युद्धाकरितां दोन वेळ द्रव्य द्यावयास कबूल झाले; परंतु तितकें द्रव्य त्या युद्धा- च्या कामास पुरेना. पार्लमेंट यापासन द्रव्य येण्याची कमती पडत चा- लली; त्याकरितां पूर्वीचे राजे संकट समयीं ज्या रितीनें द्रव्य उत्पन्न करीत, तसे राजा करूं लागला. याकरितां बेनेवोलेन्स ह्मणजे धर्मकर या नांवाचा एक नवा कर प्रजेवर बसविला, आणि त्याविषयीं शिके मोर्तबसुद्धां झाली. हा नवा कर बसला त्यामुळे लोकांस फार असंतोष झाला; परंतु निरुपायामुळे त्यांस तो द्यावा लागला; कारण तो पूर्वी बहुत वेळ दिलेला होता. असें द्रव्य प्रजेपासून उत्पन्न करून एक वेळ राजानें केडिज शहरी जाऊन हल्ला केला, तो फुकट गेल्यावर पुनः पैका उत्पन्न करायाची पहिल्यापेक्षां कांहीं बरी अशी