पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ३६. तृतीय जार्ज राजाची कथा. संन् १७६० पासून १८२० पर्यंत. द्वितीय जार्ज राजाचे मरणानंतर त्याचा नातु तृतीय जार्ज राजा राज्य करूं लागला. त्याचा बाप लहान- पणींच मेला होता. त्यानें नवेंबर महिन्यांत पार्लमेंट सभेस बोलवणें केलें. तिनें सिविल्लिस्त याची नेम- णूक प्रतिवर्षी ८००००० पोंड करून दिली. पुढले वर्षी लढाया वगैरे चालविण्याचे सारे खर्चाचा आकार एक कोटि शाण्णव लक्ष सोळा हजार एकशें एकुणीस पौंड झाला; तितकाही पैका त्या वेळचे लढायांकरितां पाहि- जेच होता. रोमन क्याथोलिक धर्माचे बायकोशी राजानें लम करूं नये असें होतें, ह्मणून जर्मनी देशचे वायव्येस एक लहान राज्यांतील मेकलेनबर्ग स्त्रिलिनस या नांवाचे वंशाचे राजे राज्य करीत होते, त्यांतून एके वायकोशीं त्याने लग्न केलें. लग्नाचा समारंभ सप्तंबर महि न्याचे आठवे तारिखेस झाला; व त्याच महिन न्याचे बाविसावे तारिखेस वेस्तमिन्स्तर आवे यांत राज्याभिषेक झाला. इ०स० १७९१ या वर्षामध्ये युरोप देशांत कांहीं मोठी लढाई झाली नाहीं. हिंदुस्थानांत बंगाल्याचे नवावास राज्यावरून का त्याचे जावयास त्याचे जागेवर नेमिलें. नंतर राज्याचा प्रधान पिट साहेब शत्रूंचे दावे व ल- ढून ॐ. म. म. द. वा. पोतदा ग्रंथ संग्रह