पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८३ त्याचा स्तुति कर्ता लिहितो की, “आह्मी त्याचे गुणा- कडे कोठें जरी पाहिले, तरी वास्तवीक स्तुति करावया- जोग्या गोष्टी बहुत आढळतील. त्याचे पूर्वी इंग्लंड दे- शांत जे राजे झाले, त्यांतून कोणी त्याचे इतका वांचला नव्हता, व कोणी त्याचे इतकें सुख भोगिले नव्हते. त्याचे अंमलाखाली त्याच्या प्रजा व्यापारांत, व कळा कौशल्यांत वाढत होत्या; आणि त्यानें आपण थोडा खर्च करून लो- कांसही तसे करण्याचा उपदेश केला, परंतु तो त्यांनी चा लविला नाहीं. त्याचा स्वभाव उतावीळ आणि रागीट होता; परंतु त्यापासून त्याचे वर्तणुकीत कांहीं फेर नव्ह- ता, तो विचारानें वागत असे, तो मनाचा उघड, सरळ, वचनाचा खरा, चाकरांवर प्रीति करणारा, तो इतका कीं, बखेडा बहुत होऊन अगदीं जरूर होई तंवपर्यंत ज्याने आपले प्रधानासही सोडिलें नाहीं, असा तो होता. सारांश, त्यानें जन्मभर उपयोगी आणि चांगला होण्याविषयीं प्र यत्न केला." असें वर्णन त्याचे मित्रांनी केले आहे; परंतु दुसऱ्यांनीं तें फिरविलें आहे. " त्याची बुद्धि, व गूण यांची स्तुति आमच्यानें करवत नाहीं. त्यास आपले जन्म देशचें वळ- कट अगत्य होते, त्यामुळे दुसऱ्या सर्व गोष्टी तो एकीकडे ठेवीत असे. तो आपण स्वतः विद्वान होता, आणि इत रांच्या विद्येचाही तिरस्कार करीत असे. त्याचे राज्यांत गुणी लोक फार झाले, परंतु त्याचे आश्रयाने झाले ना- हींत. तो इतका थोडा खर्च करीत असे कीं, त्यास कृपण ह्मणावें; आणि तो आपलेचसाठी संग्रह करीत असे, आपले प्रजांसाठीं नाहीं. त्यामध्ये मोठा असा एकही