पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ पूर्वी कांहीं रोग नसतां तो पलंगावर मरावयाचे दशेत आहे, असे त्याचे चाकरांनी पाहिले. तो नेहेमीचे वेळेस उठून त्या दिवशीं हवा चांगलीं होती ह्मणून केन्सिंगतन वागां- तून फिरून आला होता. नंतर कांहीं पळांनी तो एक- टाच असतां जमिनीवर पडला, तो शब्द चाकरांनी ऐकि- ला. त्यांनीं येऊन त्यास पलंगावर ठेविलें, आणि तो हळू बोलिला कीं, "राजकन्या एमिलिया ईला वोलवावें;" परंतु ती येण्याचे पूर्वी तो मेला. मग त्यांनी रक्त काढावयाचा यत्न केला, पण तो व्यर्थ झाला; आणि शस्त्रवैद्य उघडून पाहू लागले तंव दृष्टीस पडलें कीं, हृदयांतील उजवे वा जूची मोठी शीर फुटून त्या वाटेनें बहुत रक्त निघून गेलें होतें. ता०२५ द्वितीय जार्ज राजा सत्याहात्तरावे वर्षी मरण पावला. तो तेहतीस वर्षे राज्य करून आपला लोक शोक अक्टोवर करीत आहेत, आणि विजय होत चालिला आहे सन १७६० अशे समयीं मेला. त्यास मृत्युही चमत्कारिक आला. तेव्हां नवा मुलूख मिळवावयाची लोकांची इच्छा कमी होऊन राज्य कारभाराकडे त्यांचें चित्त लागले होतें. त्याचे मोठे राज्यांत बखेडे उत्पन्न झाले होते, परंतु ते त्याचे वेळेस पूर्णपणास आले नव्हते; ह्मणून त्याचे पुढील राजास त्यांपासून उपद्रव झाला. त्याचे आंगीं कांही मोठे गूण नव्हते. तो आपण जर्मनी देशांतील आपले मुलु- खाची खबरदारी करीत असे, आणि ब्रिटन देशांतील राज्य त्याचे प्रधान चालवीत असत. त्याचे गुणांचें वर्णन दोन विरुद्ध लिहिणारांनी या रीतीने केले आहे. 20