पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८१ ब्रिटिश फौज तीस हजारांवर जमली. यावरून लोकांस मोठी आशा होती, परंतु त्यांची लवकरच निराशा झाली. जमलेले सैन्याचा कोर्वाक शहरांत मोड झाला. नंतर उभयपक्षी बहुत वेळ जय पराजय होऊन ते छावणीत गेले. पुढे कांहीं नफा नसतां लढाईपासून तोटा मात्र होतो, असे पाहून इंग्लिश लढाई सोडून द्यावयाची मसलत करूं लागले. त्या वेळेस इंग्लिश लोकांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली, व खर्चही बहुत होऊं लागला. प्रशिया देशचे राजास पुरावा पोंचत होता, इंग्लिश यांची मोठी फौज हिंदुस्थानांत होती; दुसरी वीस हजार फौज उत्तर अमे रिका देशांतील आपला मुलूख रक्षण करीत होती; तीस हजार लोक जर्मनी देशांत होते; व पृथ्वींत दुसरे ठिका- णींही फुटकळ टोळ्या होत्या. परंतु त्यापेक्षां समुद्रांत इंग्लिश यांची बळकटी फार होती. त्यांचे सरदारांनी मोठा पराक्रम करून समुद्रांत फ्रेंचयांचे अरमाराचा अग दीं नाश केला. इंग्लिश अड्मरल यांनी सर्वत्र फार परा- क्रम केला. किवरोन समुद्रामध्यें विटांई प्रांतांचे कांठी आड्मरल हाक साहेवानें वादळांत काळोखी रात्रींत आ णि खडपाजवळ (जरी त्यापासून खलाशी लोक फारं भितात तरी) आपले इतकेच फ्रेंच गलबतांचा मोड केला. त्या काळी ब्रिटिश लोकांचें तेज सर्व पृथ्वीवर पडले होतें. या रीतीनें लढाईंत त्यांचा जय होत असतां, तो सर्व एक मोठें वर्तमान घडल्यामुळे कांही वेळपर्यंत झांकला गेला. आकटोबर महिन्याचे २५ वे तारिखेस राजास