पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८० रितां, त्यानें त्या लढाईची मसलत मोठे अगत्याने सांगि तली. अशे सर्व लोकांचे मर्जीप्रमाणे प्रिन्स फर्डिनांड, आ- णि प्रशिया देशचा राजा, यांचे मदतगारीकरितां ड्युक मार्लवरो यास कांहीं लोक देऊन पाठविलें. मग त्या जमलेल्या फौजेनें क्रेवेल्ट शहराजवळ कांहीं जय मिळ- विला. पुढे ड्युक मार्लवरो मेल्यामुळे त्याचा अधिकार लार्ड जार्ज साकिल ह्मणून इंग्लिश यांचे फौजेचे प्रीती- चा सरदार होता त्याजवळ आला. मिंडन एथील लढाईचे वेळेस फ्रेंच यांनी मोठे निकराने हल्ला केला; व पायद- ळाची लढाई सर्वत्र चालू झाली. ब्रिटिश आणि हानो- वर प्रांतांतले सार बरोबर घेऊन लार्ड जार्ज पायदळाचे उजवे बाजूस कांहीं अंतरानें होता. लढाईमध्यें फ्रेंच यांचे पायदळ मागे हटले, ही चांगली संधि पाहून फर्डिनांड यानें लार्ड जार्ज यास पुढे येण्याचा हुकूम पाठविला. तो त्यानें मानिला नाही, याचे कारण काय असेल तें असो, परंतु पुढे लवकरच लार्ड जार्ज यास परत बोलावून कोर्ट मार्शल यांत चौकशी झाली; व अपराधी ठरवून पुनः लढाईत काम करावयास तो योग्य नव्हे, असा हुकूम झाला. असे झाले तरीं शत्रु मागे हटले, व त्यांचा फार नाश झाला; आणि शेवटीं पळावयास लागून मिंडन शहरचे तटापर्यंत इंग्लिश त्यांचे पाठीस लागले. . या लढाईची इंग्लंड देशांत मोठी कीर्ति झाली; आणि अशी कल्पना निघाली कीं, ब्रिटिश लोकांची फौज आ णखी एक वेळ पाठविली ह्मणजे लढाईचा शेवट चांगला होईल, ह्मणून फौज पाठविली, आणि जर्मनी देशांत