पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७९ त्याच मग तो सर्व प्रांत जनरल आमत याचे शाहाणपणानें व उद्योगानें इंग्लिश यांचे ताबेंत आला; तो तेव्हांपासून आजपर्यंत ब्रिटिश सरकारचे राज्याकडे चालतो. वेळी कमाडोर मोर आणि जनरल हांप्सन यांनीं गा- डलुप बेट घेतले; परंतु पुढले तहांत ते परत दिलें. या रीतीनें कांहीं अधिक खर्च न पडतां हिंदुस्थानांत व अमे- रिका देशांत इंग्लिश यांस मुलूख नवा मिळत चालिला. जरी युरोप खंडामध्ये ते आणि त्यांचा साथी प्रशिया दे- शचा राजा यांनी फार प्रयत्न केला; तरी कांहीं मोठें फळ झाले नाहीं. मुळापासून आजूनपर्यंत इंग्लंड मुलखाचे हदींत लढा- ईचें दुःख झाले नव्हतें, परंतु युरोप देशांतील लढाईमध्ये पडावे अशी इंग्लिश यांस हौस होती. हें इंग्लिश रा. जास बरें वाटत असे; कारण की, त्यापासून त्याचे महा- द्वीपांतील राज्याचें रक्षण होत असे. प्रिन्स फर्डिनांड यानें प्रशिया देशचे राजास मदत करण्याकरितां हानो- वर प्रांतची फौज हाताखालीं घेतली, असें ऐकतांच का मन्स यांनी प्रशिया देशचे राजास मदत करण्यासाठीं आणि हानोवर प्रांतांत जमविलेल्या फौजेसाठी पैक्याचा चांगला पुरावा केला. जर्मनी देशांत पैका पाठवूं लागल्यावर लोकांस इच्छा उत्पन्न झाली कीं, फौजही पाठवावी. पिट साहेब पूर्वी या गोष्टीस विरुद्ध अशी प्रसिद्धी होती; परंतु आतां निक- राचे उपायांनी लढाई लवकर संपवावी ह्मणून, किंवा आ पले संबंधाचे लोकांमुळे, किंवा राजास संतोष करण्याक