पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ घेऊन त्या डोंगरावर मोठे घिरानें चढला; व कांठावरचे एके अरुंद वाटेजवळ रखवाली होती, त्यांस तेथून काढून देऊन वर पोंचला. हें ऐकून फ्रेंच सरदार मौकाम साहेब यानें लढाईची मसलत केली. मग लढाई मोठें इत निकरानें चालू झाली; आणि तीत प्रथम फ्रेंच यांचा मुख्य सरदार, व त्याचे हाताखालचा दुसरा, हे दोघे मेले गेले. जनरल वुल्फ जेथें लढाई फार दाट होती, तेथें पुढे च होता, असें पाहून शत्रूंचे कोणी गोलंदाजानें गोळी मारि ली, ती त्याचे हातास लागली तरी तो हातास रुमाल गुंडाळून पूर्वीसारखा हुकूम देत पुढे चालिला. क्यांत दुसरी एक गोळी येऊन त्याचे उरास लागली; त्यामुळे पुढे जावयास शक्ति नाहीं, अशी होऊन त्यानें त्या- जवळचे एके शिपायाचे खांद्यावर मान टाकिली. नंतर मरणाच्या वेदना होत आहेत, व प्राण आतां जाणार असे संधीस त्यानें "पळतात" असे शब्द एकिले. यास थोडी शक्ति येऊन, त्यानें “कोण पळतात" ह्मणून विचारिलें. फ्रेंच पळतात असे कळल्यावर, त्याने ते लवकरच प लागले ह्मणून आश्चर्य केले, आणि पुढे पाहवेना असे झाल्यावर त्या शिपायाचे उरावर पडला, आणि शेवटी मारावयाचे वेळेस हे शब्द बोलिला; “भी सुखाने मरतो.” या चढावापासून वेबेक शहर इंग्लिश यांचे हातीं आले; व पुढे लवकरच सर्व क्यानडा प्रांत स्वाधीन झाला. पुढले हंगमांत फ्रेंच यांनीं तें शहर घ्यावयाकरितां पुनः एक वेळ प्रयत्न केला; परंतु तेथील गवर्नर मरे यानें धीर केला, व लार्ड कालविल, इंग्लिश अरमार घेऊन आला; त्यामुळे फ्रेंच यांस तो उद्योग सोडणें प्राप्त झाले.