पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ व्हावी, याविषयीं ते उत्सुक होते. या फौजेस दुसरें आ णखीं कौंट मानस्फेल्ट् नामें एके सरदाराचें बारा हजार सैन्य येऊन मिळालें, आणि फ्रेंच दरवारानें मदतगारी कबूल केली; परंतु इतकें सर्व करून इंग्लिश यांचे मनो- गत सिद्धीस गेलें नाहीं. तें असें. इंग्लिश लोक डोवर शहरों गलबतावर बसून क्यालेइस शहरास जात होते, तेथें त्यांस आंत घ्यावें असा हुकूम नव्हता; ह्मणून ते झी- लंड यांत गेले; तेथेंही त्यांची खालीं उतरायाची नीट शी सिद्धता नव्हती. तशांत दुसरा एक अनर्थ झाला. तो असा कीं, फौजेनें फार दिवस गलबतांत काढल्यामुळे कांहीं मोठा रोग उत्पन्न झाला; तेणेंकरून गलबतावरची अर्धी फौज नाश पावली; बाकी अर्धी राहिली ती घेऊन पुढे जातां येईना. या रितीनें त्या उद्योगाची समाप्ति झाली. जेम्स राजास शेवटीं यामुळे रोग झाला हे खचित नाहीं; परंतु पुढे त्यास दुखणे लागले. इ०स०१६२५ यास कितीएक मूर्छा येऊन तो पुढे अशक्त झाला. तेव्हां त्यानें आपले मुलास बोलावून उपदेश केला कीं, तूं प्राटेस्तेंट धर्मांत वाग. पुढे स्थिर चित्तानें मृत्यूची तयारी करून तो मेला. त्या वेळेस त्याचे वयास एकुणसाठावें वर्ष होतें. त्यानें बावीस वर्षेपर्यंत इंग्लंड देशचें राज्य केलें.