पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७५ डुकेन एथील किलाही इंग्लिश यांचे स्वाधान झाला. परंतु क्रौन पाइंट याजवळ लढाई झाली, तीत त्यांचा आणखी एक वेळ मोड झाला. पूर्वी त्या कामांत उतावीळप- णामुळे ब्राडक मेला होता. आतां आबक्रीबी याने फार सावधगिरी करून तेथें जाण्यास बहुत वेळ लाविला, त्यामुळे शत्रूस लढाईची तयारी करण्यास संधि सांपडली. तो टिकोंदरेगो याजवळ गेला, तेव्हां त्यानें किल्याजवळ तळ देऊन पाडलेले झाडांचे आश्रयानें शत्रु राहिले आहेत असे पाहिले. अशा गैरसोया असतां इंग्लिश यांनी परा- क्रम केला; परंतु शत्रु निर्भय स्थळीं होते, ह्मणून त्यांनीं त्यांचा फार नाश केला. यामुळे आवक्री यानें मागें येण्याचा बेत केला. इतके शालें तरी आशा होती कीं, तो फखाना आला ह्मणजे कांहीं फत्ते होईल; परंतु अगोदर त्या ठिकाणी मोड झाला होता, त्या भयामुळे आबक्रवी यास शत्रूंचे पुढे राहावयास धीर होईना. ह्मणून तो मागें आला; आणि जेथून निघाला होता, त्या लेकजार्ज तळा- वाजवळ जाऊन राहिला. या रीतीनें इंग्लिश यांचा पराजय झाला, तथापि ल- ढाईमुळे त्यांचा स्वार्थ साधला. तो असा की, डुकेन एथील किला घेतल्यामुळे तेथील राहाणारे लोकांचे ह- ल्यांचा उपद्रव बंद झाला, आणि अमेरिका देशांतील इंग्लिश यांचे संस्थानांसभोवते फ्रेंच लोकांचे किले होते, त्यांचा परस्परें व्यवहार बंद झाला. यामुळे दुसरे वर्षी लढाईचा वेत चांगला होईल अशी आशा आली. नंतर दुसरे वर्षाचे प्रारंभी प्रधानांनी विचार केला कीं, असे मोठे देशांत एकच ठिकाणी हल्ला करून सिद्धीस जाणार ना- १६