पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ तसेच कारतां सरदार जात, ते तेथील लोकांचा भ्याडपणा आणि सुस्ती यांच्या मोठ्या फिर्यादी लिहून पाठवीत. तेथील लोकही आपल्यावर पाठविलेले सरदारांचा गर्व, लोभ, व अशक्तपणा यांचा तिरस्कार करीत. पूर्वी जन- रल शर्ली ह्मणून तेथे मोठा सरदार नेमिला होता, त्यास परत बोलावून तेथें लार्ड लौडन यास पाठविलें; परंतु तो- ही गृहस्थ तिकडून लवकरच निघून आला, ह्मणून तीन वेगळ्या लढाया करण्याकरितां तीन सरदार पाठविले. केप ब्रिटन यावर फौज पाठवावयाची योजिली होती, टिकोंद- तिचा सरदार जनरल आमतक्रोन पाइंट रेगो या दोन ठिकाणांवर पाठविलेली फौज जनरल आ बक्री याचे स्वाधीन केली होती; व तिसरी त्याचे पेक्षां दक्षिणेस फोर्ट डुकेन यावर जनरल फार्बस साहेबाज- वळ देऊन पाठविली होती. पूर्वीचे लढाईंत केप ब्रिटन, फ्रेंच यांपासून इंग्लिश यांनी घेतले होते, तें एसला शापेल एथील तहांत त्यांस परत दिले; परंतु ती जागा मोठे उपयोगाची, आणि फ्रेंच तिचा आश्रय करून इंग्लिश लोकांच्या व्यापारास उप- द्रव करूं लागले. तसेंच तें शहर माशांचे व्यापारास फार उपयोगी होतें, आणि त्या व्यापारापासून त्या वेळेस फार नफा होता. ह्मणून ते फ्रेंच यांचे हातून काढून व्यावें, अशी सर्व राज्यांतील लोकांस इच्छा उत्पन्न झाली. त्या शहरचे सभोवता लुइसबर्ग एथील फार बळकट किला होता, तेथें इंग्लिश यांनीं मोंठ्या शौर्यानें हल्ला केला, आणि तें ठिकाण त्यांचें स्वाधीन झालें. मग लवकरच तो किला मोडून टाकिला.