पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हीं. त्यांनी मसलत केली की, एकदाच उत्तर अमेरिका देशांत तीन ठिकांणी हल्ला करावा; आणि त्या हल्ल्याची तयारीही झाली. मुख्य सरदार जनरल आमत यास बरोबर बारा हजार लोक देऊन क्रौन पाइन्ट यावर पा- ठविलें, की ज्या ठिकाणीं इंग्लिश यांचें सामर्थ्य फार दि वस फुकट गेले होते. जनरल वुल्फ याने समोरचे वा- जूस सेंटलारन्स नदींत शिरून अमेरिका देशांतील फ्रेंच यांची राजधानी किवेक यास वेढा घातला; व जनरल प्रीडाक्स आणि जनरल जान्सन यांनीं नयागरा नदी- जवळ फ्रेंच यांचा किल्ला होता तो ध्यावयाचा उद्योग आरंभिला. या तीहींतून शेवटची लढाई प्रथम सिद्धीस गेली. नि- यागरा एथील किला मोठे कामाचा होता; आणि त्यापा- सून फ्रेंच यांचे उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील संस्था- नांची परस्परांशीं वहिवाट राहिली होती. प्रथम वेढा चांगला पडला; परंतु जनरल प्रीडाक्स तोफा फुटल्यानें मेला गेला, ह्मणून सारें काम जनरल जान्सन साहेबावर पडले. त्यानेंही पूर्वीचे सरदाराप्रमाणे पराक्रम करून अर्ध तासाचे आंत सगळी फौज पळविली. मग ते पाहून किल्लेकरीही आपण इंग्लिश यांचे स्वाधीन होऊन बंदीत पडले. जनरल आमत याचीही अशीच फत्ते झाली; परंतु इतकी प्रतिष्ठा झाली नाहीं; कारण कीं, तो लढाईचे ठिकाणी गेला, तो क्रौन पाइंट व टिकोंदरेगो हीं दोनही ठिकाणें तेथील लोकांनी सोडून देऊन मोडली. नंतर सर्व उत्तर अमेरिका देश इंग्लिश यांचे हाता- खाली येण्यास एक शेवटची लढाई करून केबेक शहर