पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७३ ...असा पूर्वेस विजय होत चालला असतां पश्चिमेस त्या- पेक्षा अधिक होत चालिला. प्रधानांत कांही फेरफार झाला, हें तो जय होण्यास कारण; पूर्वीचे प्रधानांस का मन्स यांचा आश्रय नव्हता, व त्यांचेमध्यें एक मत नव्हतें, त्यांचे मर्जीप्रमाणे कांहीं एकादी गोष्ट झाली नाहीं, किंवा कोणी नवे पुरुषाची नेमणूक झाली, ह्मणजे ते आपल्या जागा सोडीत; आणि आपले मर्जीप्रमाणे झालें, ह्मणजे पुनः येत. या रीतीनें राजाचा अंमल कमी व लार्ड यांचा अंमल अधिक होत चालिला होता. हें राजाचे लक्ष्यांत येऊन त्यानें कारभाराकरितां कांहीं नवे लोक नेमिले, ते जुने प्रधानांनी कबूल केले. नवे प्रधानांत मुख्य मोठा प्रसिद्ध विलियम पिट नामें साहेब होता; त्यावर लोकांनी मोठा भरंवसा ठेविला होता. जुने प्रधानांनी राजाने नेमिलेले लोकांस आपले मंड- ळींत घेतलें खरें; परंतु ते लवकरच त्यांचा द्वेष करूं ला- गले, व राजास त्यांचा तिरस्कार यावा अशा युक्ति यांनीं आरंभिल्या. राजाचें जर्मनी देशांतील मुलुखाकडे फार लक्ष असे, तेंच जुने प्रधानांनी वाढावयासाठी यत्न केला होता; आणि नवे ह्मणूं लागले कीं, त्यापासून राज्याचे स्वार्थ बुडतील. अशे त्या दोघांचे बोलण्यांतून आपले मतास जें मिळालें तें घेऊन, राजानें थोडे महिन्यानंतर पिट साहेबास कामावरून दूर केलें; परंतु तें राजाचें करणें लोकांस आवडलें नाहीं, ह्मणून त्या पिट साहेबास फिरून सरकारचा सक्रतारी याचे काम सांगितलें. नवे प्रधान नेमिल्यावरही पूर्वीचे प्रधानांच्या वाईट मस- लतींची फळे अमेरिका देशांत येत होती. तेथे लढाई