पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ सरकारचा नाश झाला होता, त्याचा सूड घ्यावयास गेला. तो डिसेंबर महिन्याचे प्रारंभी बंगाल देशांत बालासोर शहराजवळ जाऊन पोचला. तो कलकत्यास जाईपर्यंत त्यास कांहीं उपद्रव झाला नाहीं. दोन गलबतें घेऊन आड्मरल तेथे जातांच त्यावर चहूंकडून तोफांचा मार केला; परंतु त्याने त्यापेक्षां अधिक शौर्यानें तोफा चालू करून दोन तासांचे आंत तो किल्ला घेतला. नंतर लवकरच मोठे व्यापाराचें शहर हुग्ली ह्मणून आहे, ते त्यांनी सहज घेतलें; आणि बंगालचे नवावाच्या साऱ्या वखारी मोडून टाकिल्या. याचा सूड घेण्याकरितां त्या नवावाने दाहा हजार स्वार व पंध्रा हजार पायदळ जमा करून इंग्लिश यांस त्यांचे सर्व संस्थानांतून काढून टाकावयाची मसलत केली. ही बातमी समजतांच कर्नल क्लैब साहेवानें आड्- मरल याचे कांहीं लोक मदतीस घेऊन त्यांवर स्वारी केली; आणि त्याची फौज फार थोडी असता, त्यानें नवा- बाचे इतके मोठे सैन्याचा पराभव केला. त्या वेळेस मोगलाचा अंमल बहुत दिवसांपासून कमी होत आला होता; ह्मणून बंगालचे तक्तावर इंग्लिश यानें एक नवाव बसवून आपल्यास जसे पाहिजे होते तसे व्यापा- सून करार करून घेतले. ते असे की, आपले मनास वाटेल तेव्हां मुलूख आपले स्वाधीन व्हावा. या रीतीनें हिंदुस्था- नाचे राजांस अमलाखालीं आणून त्या देशांत फ्रेंच लोक फार दिवसपर्यंत इंग्लिश यांशीं तंटा करीत असत, यांस खाली करावें; ह्मणून कर्नल क्लैव साहेवानें प्रयत्न आरंभिला, आणि फार दिवस न लागतां त्यांचीं सारीं ठाणीं घेऊन त्यांस निर्वळ केलें.