पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७१ लांच देऊन एकएकास वेगळे वेगळे बंदिखान्यांत ठेवावें, अशी प्रार्थना आरंभिली. परंतु नवाबास त्या वेळेस झोप लागली होती, ह्मणून कोणाच्यानें बोलवेना. मग ते निराश होऊन मोठ्यानें आक्रोश करूं लागले, आणि मोठी ओरडा- ओरड झाली; परंतु मग काही वेळाने ती ओरड शमली, आणि त्या हतभाग्यांस ओरडावयाची शक्ति नाहीं, असे हो- ऊन त्यांचे प्राण जावयास प्रारंभ झाला. रखवाली लोक सकाळी जाऊन पाहातात, तंव जिकडे तिकडे उजाड व भयंकर दृष्टीस पडले. त्या एकशें चाळीस लोकांतून सकाळी तेवीस वांचले; परंतु त्यांस सोडल्यावर बहुतकरून सर्व ताप लागून मरण पावले.

असा तो कलकत्त्याचा किल्ला गेल्यामुळे इंग्लिश यांची पुढे बढती होण्यास विघ्न झाले; परंतु व साहेबाचें शौर्य, व आड्मरल वाट्सन साहेबाचें अरमार, या दोहोंचे मद- तीनें पुनः त्यांचा जय होत चालला. त्या देशांत एक तुळाजी अंग्न्या ह्मणून प्रसिद्ध संस्थानी होता, त्यानें चांचे- पणा करून समुद्रकांठचे सारे राजे आपले ताबेखाली आ णिले होते. तो जवळ पुष्कळ मोठीं गलबतें बाळगून दुसरीं गलबतें लुटीत असे. त्यापासून कंपनी सरकारास फार उपद्रव झाल्यामुळे असे ठरविलें कीं, याचा मोड करावा. मग कर्नल क्लैव साहेब व आड्मरल वाट्सन साहेब हे विजयदुर्ग किल्यांत शिरले. तेथें प्रथम त्यांवर तोफांचा मार झाला खरा; परंतु त्यांनी लवकरच त्यांची गलवतें जाळून किल्ला घेतला. तेथे लढाईचें बहुत सामान व पुष्कळ माल सांपडला. मग कर्नल व साहेब पूर्वी जो कलकत्यांत कंपनी