पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७० वर्तप्पुकीनें इंग्लिश यांचा चढाव होत चालिला. तो व साहेब कंपनी सरकारचे राज्य कारभाराचे खात्यांत प्रथम चाकरीस राहिला होता; परंतु आपले गुण लढाईचे उपयोगी फार आहेत, असे समजून लिहिण्याचें काम सोडून तो शिपायांत उमेदवारीस राहिला. त्याचा शूरपणा लवक- • रच त्याचे वरचे लोकांचे लक्ष्यांत येऊ लागला; आणि त्याची वर्तणूक, आणि लढाईचे कामांत कुशळपणा हीं सम- जून त्यास लढाईंतली पहिली पदवी मिळाली. त्यानें प्रथम अर्काट प्रांतांतून फ्रेंच यांस काढून टाकिलें, हा पराक्रम मग लवकरच त्यांचे सरदारास धरून कैद केलें; आणि तेथील नवाबाचा पक्ष इंग्लिश यांनीं धरिला होता, त्याचें राज्य फ्रेंच यांनीं घेतले होते, तें परत त्यास दिले. केला. त्या देशांतील मोठे बळकट राजानें इंग्लिश यांचा सूड घ्यावा, अशे बेतानें लढाई करावयाची प्रतिज्ञा करून बहुत फौज घेऊन त्या देशांतील ब्रिटिश सरकारचा मुख्य किला कलकत्ता यास जाऊन वेढा घातला. रानवट लोकांच्या हल्ल्यावरही टिकाव धरावयाजोगा तो किला नव्हता; आ- णि तेथील अंमलदार पळाला, ह्मणून तो किला शत्रूंचे हाती गेला. मग तेथें एकशें चाळीस लोक रखवालीस होते त्यांस धरून बंदीस घातलें. तें चोहोबाजूने झांक- लेले ठिकाण सुमारे अठरा फुट चौरस होतें, व त्यास पश्चि मेकडचे बाजूनें दोन लोखंडाचे खिडक्यांचीं द्वारें मात्र वा- रा येण्यास वाट होती, परंतु त्या दान्यास पसरावयास जा- गा नव्हती; ह्मणून त्या आगीसारिखे जागेत त्यांचे प्राण कोडूं लागले. त्यांनी प्रथम दार उघडावयाचा यत्न केला; परंतु तो व्यर्थ गेला, ह्मणून त्यांनीं रखवाली लोकांस बहुत