पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नंतर कोर्ट मार्शल यानें त्याची चौकशी करून असें ठर- विलें कीं, त्यानें लढाईमध्यें शत्रूंचा नाश करण्यांत परा- काष्ठेचा यत्न केला नाहीं; ह्मणून लढाईचे वारावे काय द्याप्रमाणे त्यास ठार मारावें; परंतु त्याची वर्तणूक अजा- णपणानें झाली होती, भ्याडपणामुळे झाली नव्हती, ह्मणून त्यावर दया करावी, अशी त्यांनी शिफारस केली. मेंट आणि राजा यांनी हें कांहीं ऐकिलें नाहीं; आणि पहिलेच शासन ठरविलें. मग त्यास गलबतावर गोळी पार्ल- घालून मारिलें. त्या वेळेस त्यानें मोठे धीरानें वर्तणूक केली. विंग याचें हें शासन कठीण झालें खरें; परंतु त्याचें फळ पुढे उघड दृष्टीस आलें. लढाई अशी चालत असतां, शेवटीं या रीतीने सर्व युरोप खंडांत सरकाराच्या फौजा एकमेकांवर लढावयास तयार झाल्या होत्या. अमेरिका, एशिया, आणि समुद्र या तीहींमध्ये इंग्लंड व फ्रान्स यांची लढाई चालली हो- ती. युरोप खंडांत हानोवर देश राखण्याची प्रशिया देशचे राजानें प्रतिज्ञा केली होती; व त्या राजाचे मदतीस लोक व पैका पाठविण्याचें इंग्लिश राजानें कबूल केलें होतें. फिरून प्रशिया देशचे राज्यावर आस्त्रिया या देशचें संधान होतें, व साक्सनी एथील इलेक्टर याचा- ही बेत तोच होता. या बेतास फ्रान्स, स्वीडन, आणि रशिया हेही तीन मुलूख अनुकूळ होते; त्यांत रशिया देशास आपले राज्य पश्चिमेकडेस कांहीं वाढावें, अशी आशा होती. असें वर्तमान असतां पूर्वदिशेकडून प्रथम ब्रिटिश फौ- जेस विजय मिळण्याचा प्रारंभ झाला. तेथें क्लेव साहेबाचे