पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६८ फ्रेंच यांचे निशाण कांठावरच आहे, व किल्ल्यावर ईलिन श यांचेंच आहे, असे पाहिले. त्यांस किल्ल्यामध्ये लोकांची एक टोळी पाठवावयाचा हुकूम होता; परंतु त्यास तसे करण्यास धीर होईना. ह्मणून त्यानें त्याविषयी प्रयत्नही केला नाहीं. इतक्यांत त्याचे अरमाराएवढेच फ्रेंच यां- चें अरमार आले. त्या वेळेस त्याने अनेक मसलती मनांत आणून शेवटीं लढाईची तयारी करण्याचा हुकूम केला. मग फ्रेंच यांचे अरमार पुढे आले, व इंग्लिश यांचे अर माराचाही कांहीं भाग लढावयास पुढे झाला; परंतु आड्मरल एकीकडेच राहिला. ह्मणून तें फ्रेंच लो- कांचें अरमार निघून गेलें; आणि बिंग यास जवळची लढाई करण्याचा दुसरा कधी प्रसंग आला नाहीं. अशी बिंग याची वर्तणूक ऐकून इंग्लंड देशांत लो कांस फार राग आला. प्रधानांनीही ती गोष्ट आपले आंगावरून टाकिली, आणि विंग याचे नाशास आंतून साहित्य केलें. नंतर तो मिनोर्का बेटांतील किल्ला फ्रेंच लोकांचे हातीं गेला, असे जेव्हां लोकांचे कानास आले, तेव्हां त्यांस फारच संताप झाला. त्या समयी आपण केले ते चांगले असे समजून व आपले नाशाविषयों इंग्लंड दे शांत सिद्धता होत आहे, हे न कळून विंग जिब्राल्टर शहरांतच होता. मग लवकरच हुकूम गेला कीं, त्यास कैद करून इंग्लंड देशांत आणावें. त्याप्रमाणे आणिल्या नंतर ग्रीनिच हास्पितल यामध्ये त्यास बंदींत ठेविलें. कांहीं युक्ती करून लोकांस त्याचा तिरस्कार आ णविला, व सर्व प्रांतांतून पत्रे येऊं लागली की, त्या अपरा ध्याचे शासन करावें. तीं पत्रे प्रधान कबूल करूं लागले.