पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मेहेनत केली, पण त्याचा पराभव झाला. तो रानांतून जात असतां वाटेने त्याचे फौजेवर अकस्मात् शत्रूंनीं दडून राहून मागून व पुढून बंदुका चालू केल्या. ब्राडक यानें तशा वेळी मागे न हटता बहुत पराक्रम केला; परंतु त्याचे छातीत गोळी लागून तो पडला, आणि सैन्यांत धांदल त्याचा सर्व तोफखाना, व चुण लागले, आणि त्याचे लोक सातशे मेले गेले. झाली. शत्रूंचे हात अशी असा इंग्लिश यांचा मोड झाला ह्मणून त्यामध्ये असं तोष, भय, आणि परस्परामध्यें वैर उत्पन्न झाले. संधी पाहून फ्रेंच यांनी युरोप खंडांत तंटा चालू केला. मिनोर्का बेट आन राणीचे राज्यांत इंग्लिश यांनी घेतले होतें, व तें बहुत तहांमध्ये त्यांकडे मुकरर झाले होते; परंतु त्या वेळेस प्रधानांनी तें राखण्याचा बंदोबस्त चांगला ठेवि- ला नाहीं, ह्मणून फ्रेंच यानीं जाऊन सेंटफिलिप किल्या- स वेढा घातला. तो किल्ला फार वळकट होता. व त्या- वर मोठा शूर ब्लकी ह्मणून सरदार होता. तो राखण्या- साठी इंग्लिश यानीं कांही वेळपर्यंत मेहनत केली, परंतु शेवटीं तें ठिकाण शत्रूंचे स्वाधीन झालें. हा अकस्मात् वेढा पडला, असें ऐकून प्रधानांनी तो उठवावयाचा निश्चय केला. त्याकरितां त्यांनी लढाऊ गलबतें दाहा बरोवर देऊन आड्मरल बिंग यास पाठ- बिलें, व हुकूम केला कीं, मिनोर्का वेट राखण्यास कोणते तरी रीतीनें मदत करावी. विंग जिब्राल्टर शहरास गेला, तेथील अंमलदारानें आपलेच किल्ल्यास भय आहे, असे निमित्त करून त्यास कांहीं पुरावा केला नाही. मग तो विंग तेथून निघाला; आणि बेटाजवळ आला, तो त्यानें