पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झालें; तें अर्से कीं, मिसिसिपी नदीच्या समुद्राशी संगम प्रथम आपण पाहिला, असे निमित्त करून फ्रेंच पूर्वेकडे न्युवेक्सिको देशापर्यंत जवळचा सर्व मुलूख, व पश्चिमेस आपले खियन डोंगरापर्यंत सारा मुलूख आपला ह्मणूं ला- गले. त्यांनीं त्या डोंगरापलीकडे व्यापाराकरितां व देश चांगला पाहून कित्येक इंग्लिश लोक जाऊन राहिले होते यांस काढून टाकून किले वांधिले, असे की सभोवता सा- रा मुलूख आपले स्वाधीन व्हावा. अशीं अमेरिका देशांत नवीं लढाईचीं कारणे होत, असतां, एशिया खंडांत हिंदुस्थानचे पश्चिम कांठावर इंग्लिश व फ्रेंच यांच्या लढाया कधीं संपल्या नव्हत्या. त्या वेळेस इंग्लिश यांचे प्रधानांनीं लढाईचा उद्योग आवेशानें आरंभिला. त्यांनीं अमेरिका देशांत एकदांच चार ठिकाणीं लढाई सुरू केली. त्या चोहोंतून एकींत जनरल मंक्टन यास सरदार करून पाठवून दिलें, व हुकूम केला कीं, फ्रेंच यांस नोवास्कोशिया प्रांतांतून काढून टाकावें. दुसरी लढाई दक्षिणेस क्रोन पाइंट यावर करण्याकरितां जनरल जा- न्सन यास नेमिलें. तिसरी लढाई जनरल शर्ली यानें न्यागरा नदीवरील किल्ले घेण्याकरितां करावी, असा हुकूम केला; व चवथी लढाई करावयास त्यापेक्षां दक्षिणेकडे डुखेन या किल्यावर जनरल ब्राडक्यास पाठविलें. इ०स० १७५६ या लढायांत मंक्टन याचा जय झाला. जान्सन याचाही जय झाला, परंतु त्याला ज्या किल्ल्यावर पाठविले होतें, तो त्याचे हाती सांपडला नाही. शर्ली यानें वेळ लावून लढाईचा समय घालविला ब्राडक् यानें शूरपणानें