पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ यांत इतका वाढला कीं, राजा त्या वेळेस घाबरला; परंतु त्या दुर्वृत्तामुळे अनर्थांचा उद्धव मात्र झाला; ते त्याचे मु लांस भोगावे लागले. राजाच्या स्वदेशांत अशी धुंदाई चालत असतां जर्मनी देशांत जें वर्तमान घडलें,त्यापासून शेवटी फार नाश झाला. राजाची वडील मुलगी फ्रेडेरिक नामें जर्मनी देशचा इलेक्टर पालेटैन होता त्यास दिली होती. त्या राजानें एंपरर दुसरा फर्डिनंड होता त्याशी लढाई केली; त्यांत त्याचा पराजय झाल्यामुळे त्यास हालंड यांत चोरून जा ऊन रहावे लागलें; त्याचे आणि इंग्लिश सरकारचें मुळ चें नातें होतें; त्यांत तो संकटांत पडलेला, आणि त्यानें प्रा. टेस्तंट धर्माकरितां फार कष्ट भोगले, त्यामुळे इंग्लंड दे- शांतले लोक मनापासून इच्छित होते की, त्याचें बरें व्हावें; ह्मणून कामन्स यांकडून राजाकडे नेहमी अर्ज्या चालिल्या असत; त्यांत सारांश हा कीं, राजाने फ्रेडेरिक याचा पक्ष धरून त्यास पुनः आपले पदावर स्थापावें. जेम्स राजानें प्रथम अशी युक्ति केली कीं, तह करून आपले जांवयाची विपत्ति दूर करावी; परंतु तो वेत सिद्धीस जाईना असें पा हून प्रतिज्ञा केली कीं, आपले बाहुबळाने माझे जांव- यास मुक्त करीन. त्याप्रमाणे स्पेन देशाशी युद्ध करावें, असा निश्चय ठरला; मग हालंड देशांत राजपुत्र मारैस उद्योग करीत होता, त्याचे मदतगारी करितां सहा हजार लोक तेथें पाठविले. तेव्हां राजाचें शौर्य पाहून इंग्लिश लोकांस परम आल्हाद झाला; कारण पोप याचे मतानुसाऱ्यांचें नुकसान करावयाकरितां कोणत्या तरी निमित्ताने लढाई •