पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६५ व फ्रेंच या दोघांमध्ये फिरून लढाई चालू झाली. त्या प्रांताचे शेजारचे रानांत राहणारे मुळचे क्रूर अज्ञानी लोक होते, ते इंग्लिश यांचा पहिल्यापासून द्वेष करीत असत; तशांत फ्रेंच यांचा व इंग्लिश यांचा मूळचा द्वेष होताच, ह्मणून त्यांनी इंग्लिश लोक मोठे शूर व दुष्ट असे त्या लोकांस सांगून तो द्वेष वाढविला. हे तंटे मि ●टवावयास पारीस शहरास वकील पाठविले; परंतु ते त्या लोकांसच समजले नव्हते, ह्मणून कांहीं बंदोबस्त झाला नाहीं. प्रथम नवी लढाई होण्यास हा प्रांत कारण; ह्मणून या- च्या कांहीं विशेष गोष्टी लिहिल्या पाहिजेत. त्या नोवा- स्कोशिया प्रांताची लागवड प्रथम फ्रेंच लोकांनी केली होती, व मेहेनत करून तेथील मूळची ओसाड जमीन शे- तकीस उपयोगी केली होती. त्या प्रांताचे धनी बहुत वेळ बदलून शेवटीं तो इंग्लिश यांकडे आला होता, आ- णि तो त्याजवळ असावा, असे युत्रेक्ट एथील तहांत ठरलें होतें. तो प्रांत, इंग्लिश यांची उत्तरेकडील संस्थानें रा- खावयास, व तेथील मासे मारण्यांत सर्वांपेक्षां त्याजवळ अधिक सत्ता ठेवावयास उपयोगी होता. इकडे त्या देशाचे पाठीमागे फार दिवस फ्रेंच लोक राहात होते, त्यांचा निश्चय होताच की, कोणत्या तरी युक्तीनें तो इंग्लिश लोकांपासून घ्यावा, ह्मणून त्यांनी तेथील राहणारे लोकांकडून इंग्लिशयांशीं उघड लढाया करविल्या. या इंग्लिश प्रधानाचे कानास आल्या पण बंदोवस्त झाला नाहीं. पुढे लवकर त्याच देशांत दुसरे एक लढाईस कारण