पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आस्त्रिया देशचा एंपरर याजवळ जावीं. डंकिर्क एथील समुद्र कांठचा किला मोडावा, व अमेरिका देशांतील न्युस्पेन प्रांतांत इंग्रेजी गलबत गुलाम भरून प्रतिवर्षास जात असे, तें आणखी चार वर्षेपर्यंत जाऊं द्यावें. प्रशिया देशचे राजानें सिलिसिया प्रांत नुकताच घेतला होता, तो त्याजवळ मुकरर करावा; व हंगरी देशचे राणीनें बापाचें राज्य भोगावें. तसेंच केप ब्रिटन व दुसरी फ्रेंच सकारची ठिकाणे इंग्लिश यांनी घेतली होतीं, ती परत देई- पर्यंत इंग्लिश यांनी दोन अवरूचे माणूस फ्रेंच सरकारा- कडे ओलीस पाठवून द्यावे. या कलमांत इंग्लिश यांची फार अपकीर्ति झाली. तसेंच अमेरिका देशचे समुद्रांत इंग्लिश लोकांचे गलबतांस शोधीत असत; ह्मणून लढाई उत्पन्न झाली होती, परंतु त्याचा कांहीं बंदोबस्त झाला नाहीं. अमेरिका देशांतील संस्थानाच्या हद्दी मुकरर झाल्या नाहीत, व इंग्लिश यांनी किले परत दिले, त्यांचे बदल त्यांस कांहीं दिले नाहीं. सारांश, पूर्वी पुत्रे क्ट शहरांत तह झाला होता, त्यापेक्षा हा फार वाईट झाला; परंतु त्या वेळेचे लोकांस तो फार चांगला आवडला. वर सांगितले तहापासून युरोप खंडांत मात्र फ्रेंच आणि इंग्लिश यांच्या लढाया बंद झाल्या; परंतु हिंदुस्था- नांत व वेस्ट इंडीस वेटे एथे मोठ्या निकराने चालल्याच होत्या. नोवास्कोशिया ह्मणून उत्तर अमेरिका देशाचा एक प्रांत आहे. तेथें इंग्लिश सरकार आपले राज्यांतून लोक पाठवीत असत. त्या ठिकाणची जमीन थंड, उजाड, व शेतकीस निरुपयोगी होती; परंतु तीसाठींच इंग्लिश