पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६३ कांनी जर स्तुती केली नसती, तर त्याचे जाणें व्हावयास कठीण पडतें. • तिकडे प्रिटेंडर याचे पाठीमागें लोक लागले असतां इकडे बंडवाल्यांचे फौजेंतून सत्रा सरदारांस केनिग्तन कामन ठिकाणी फांशी दिले. क्याल शहरांत नवांस असेच ठार मारिलें, व यार्क शहरास अकरांस मारिलें. थोड्यांस क्षमा मिळाली, आणि पुष्कळ सामान्य लोकांस उत्तर अमेरिका देशांतील संस्थानांत पाठविलें. किल्मा- र्नाक व क्रोमार्ती एथील अर्ल, व लार्ड वाल्मरीनो यांची चौकशी लार्ड यांनी केली; आणि त्यांवर गुन्हा लागू झाला. क्रोमार्ती यास क्षमा मिळाली; आणि दुसरे दो- घांचा किल्ल्यावर शिरच्छेद केला. या रीतीनें जय, पराजय, तहाचें बोलणें, लवाडी, आ- णि बंडे कितीएक वर्षेपर्यंत एकापुढे एक अशीं होऊन, शेवटी सर्व पक्षांचे लोकांस आपण अधिक दुर्बळ होत आहों, असें वाटून त्यांनी तह करावा असा निश्चय ठरविला. सर्वांनीं एसला शापेल या ठिकाणी एकीकडे मिळावे असे ठरले. त्या ठिकाणीं ब्रिटिश राजाकडून वकील अर्ल सांड्विच आणि सर टामस राविन्सन् हे दोघे गेले होते. प्रारंभी लढाईंत जीं ठिकाणें घेतली होतीं, ती ज्यांची त्यांस परत द्यावीं, असें होऊन तहाचा प्रारंभ झाला. त्या तहांत पुढे लिहिलेली कलमें ठरलीं;- लढाईंत जे बंदिवान धरिले होते ते, व ठिकाणें घेतलीं होतीं तीं, ज्यांचीं त्यांस परत द्यावीं. पार्मा, प्लेसेन्शिया, आणि ग्वास्ताला, हे प्रति स्पानिश राज्याचा वारिसदार डान फिलिप यास द्यावे; परंतु तो पुढे स्पेन देशचा राजा झाला असतां, ती संस्थान