पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ मिळेल, असे ठरविले होते, त्याचे बरोबर कोणी एक शेरि डन नांवाचा मनुष्य असे, तो त्यास तशे विपत्तींत धीर देई. याचे अज्ञातवासाची गुह्य गोष्ट सुमारे पत्रासांपेक्षा अधिक लोकांस कळली; परंतु त्याचे वंशाचा मान सर्व राखीत होते, ह्मणून कोणी ती लोभानें प्रगट केली नाहीं. एके दिवशीं तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालून संध्याकाळी एके घरांत गेला; त्या घराचा धनी शत्रूचे पक्षाचा आहे असे त्यास ठाऊक होतें. तो जातांच घर- धण्यास बोलला. " तुमचे राजाचा मुलगा तुमच्या पार्शी थोडी भाकर, व थोडींशीं वस्त्रे मागावयास आला आहे. तुह्मांस माझे शत्रूंचें सांप्रत अगत्य आहे हे मला कळलें; परंतु असा मी विपत्तीत पडलों असतां तुली माझा विश्वास - घात करणार नाहीं; अशी माझी खातर आहे." त्या घर- धन्यास त्याची दुर्दशा पाहून दया येऊन त्यानें त्याचा फार समाचार घेतला, आणि ती गोष्ट कोणास कळविली नाहीं. असा तो ग्लेन्गारी एथील रानांत सुमारें साहा महिने फिरत होता. शेवटी त्याचे साथी लोकांनीं सेंट मेलोस गांवचें एक गलबत भाड्यानें केलें, त्यावर तो फार गरी- वाचे वेषानें बसला. बहुत दिवस दुःखें भोगून त्याचें शरीर त्या वेळेस फार मलीन व कृश झाले होते. त्याचे बरोबर, सलिवन व शेरिडन असे दोन ऐरिश लोक, लोखील एथील क्पाम्रन व त्याचा भाऊ इतके गलबतावर चढले. त्यांचे पाठीस इंग्लिश यांचीं दोन लढाऊ गलबतें लागलीं होती; परंतु ते स्वस्थपणे ब्रिटाई प्रांतांत मोर्लेस गांवाज- वळ रोझो ह्मणून ठिकाण आहे तेथे पोचले. तो प्रिटें- डर मारिला गेला, असें ऐकून त्याचे पाठीस लागलेले लो-