पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० हैं प्रिटेंडर यास योग्य होते, परंतु तो एडिक्रो शहरांत मदतीची वाट पाहात राहिला; तितक्यांत त्याशी लढाई करण्याची सरकारानें चांगली तयारी केली. जनरल वेड ह्मणून सरदार आपले बरोबर साहा हजार डच फौज घे- ऊन उत्तरेस गेला. डयुक कंवर्लंड लांडर्स देशांतून आला; आणि त्याचे मागून चांगले बंदोबस्ताची एक स्वा- रांची आणि पायदळाची टोळीही आली. याशिवाय बहुत- करून सर्व लोकही प्रिटेंडर यांशीं विरुद्ध होते. असे असतांही त्यानें इंग्लंड देशावर हल्ला केला, आ णि तीन दिवसांत क्यौर्लल शहर घेतलें. तेथें त्यास बहुत लढाईचीं शस्त्रे मिळालीं, आणि त्याने आपला वाप राजा असे जाहीर केले. हे ऐकून जनरल वेड साहेब त्याजवर येऊं ला- गला; परंतु शत्रु दोन दिवसांचे वाटेवर आहेत, असें सम- जल्यामुळे तो परत गेला. देशांतून दक्षिणेकडचे वाजू- वर फौज येणार आहे, असे ऐकून कांहीं अटकाव न होतां प्रिटेंडर पुढे चालला; नंतर तो स्काट्लंड देशचा वेष करून पायदळावरोवर पायीं मांचेस्तर शहरास गेला. तेथे त्यास दोनशे इंग्लिश लोक येऊन मिळाले; तेथून तो डर्बी शहरास चालिला; आणि तेथून त्यानें वेल्स प्रां- तांत जाण्याचा निश्चय केला. तेथें आपले पक्षाचे फार निघतील असे त्याचे मनांत होते; परंतु त्याचेच फौजेंत तंटा उत्पन्न झाल्यामुळे त्याचें जानें झालें नाहीं. त्याचा फौजेवर फारसा हुकूम चालत नव्हता; कारण की, हैलंड एथील सरदारांस दुसऱ्याचे तात्रेखाली राहाण्याचा अभ्यास