पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५९ कांच्यानें सोसवत नाहींत. असे समजून त्यानें थोडा पैका, आणि मदतीचीं वचनें फ्रान्स राज्यापासून घेऊन एक लहान फ्रिगेट यावर टलिवार्न एथील मार्कुइस, सर टा- मस शेरिडन, आणि दुसरे कित्येक साहसी लोक घेऊन तो स्काट्लंड देशास निघाला. सर्व ब्रिटिश राज्य घ्या- वयासाठीं असे सात सरदार व दोन हजार माणसांचीं ह- त्यारें इतके मात्र त्यानें वरोबर आणिलें. तो पर्थ शहरास पोचल्यावर त्यानें मी ग्रेटब्रिटन देशचा राजा, अशी जाहिरात केली. तेथून निघून जात असतां वाटेने त्याची फौज वाढत चालली. आणि तो लढाईवांचून एडिंबरो शहरास पोंचला. तेथेंही त्यानें मी राजा, असे जाहीर केले, आणि इंग्लंड व स्काट्लंड यांचा मिलाफ झाला; ह्मणून लोकांस असंतोष झाला याकरितां मी तो मोड- णार अशी त्यानें प्रतिज्ञा केली; परंतु एडिंबरो शहरचा किला त्याचे स्वाधीन झाला नाहीं; आणि तो घ्यावयास त्याजवळ तोफा नव्हत्या. उत्तर प्रांतांत वंडवाल्यांचे माठीमागें, सर जान कोप लागला होता, परंतु त्यानें त्यांशी लढाई केली नव्हती. त्यास आतां स्वारांच्या दोन पलटणी येऊन मिळाल्या, ह्मणून त्यानें एडिंवरो शहरास जाऊन शत्रूशीं लढाई क- रावयाची मसलत केली. प्रिटेंडर याची फौज त्यापेक्षां अधिक होती, पण तिला बंदोबस्त नव्हता. मग प्रिटेंडर यानें प्रेस्तन् पान्स गांवाजवळ सर जान कोप याजवर हल्ला करून थोडके वेळांत त्याचा पराजय केला. त्या लढाईंत राजाचे पांचशे लोक पडले, आणि बंडवाल्यांस त्याचा उपयोग झाला. त्या वेळेसच इंग्लंड देशांत जावें