पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ ग्लिश यांचा विजय दिसत होता, आणि तेही फत्ते झाली- च असे समजले होते; इतक्यांत फ्रेंच यांचा सरदार साक्स; जो दुखण्यानें पुढे मेला, त्यानें पीडित असतांही पालखीत बसून सर्वत्र फिरला; आणि त्यानें सैन्यास धीर दिला कीं, आज आपणास युद्ध प्रतिकूल दिसतें खरें, पण दिवस आपला असे समजा, इंग्लिश यांची एक टोळी कांहीं बंदोबस्तावांचून सहज धट्टाईनें शत्रूंचे रागांत जा- ऊन पडली; तिला आंत घेण्याकरितां त्यांनी दोन बा जूंस होऊन वाट केली. मग फ्रेंच यांनी तीन वाजूंनीं आपला तोफखाना सुरू करून ते त्यां लोकांवर बार करूं लागले. तथापि त्या टोळीनें बहुत वेळपर्यंत धीर सोडि ला नाहीं; शेवट सुमारें संध्याकाळचे प्रहर दिवसास ती मागें परतली, त्या लढाईमध्ये फार लोक पडले. इंग्लिश व त्यांचे साथी यांचे सुमारें बारा हजार पडले; आणि फ्रेंच लोकांचेही तितकेच पडून त्यांस जय प्राप्त झाला; परंतु तेणेंकरून जें फळ प्राप्त झाले, ते त्यांनी पुढे सारे लढाईपर्यंत गमाविलें नाहीं. ब्रिटिश सैन्याचा समुद्रांतून आणि जमिनीवरून असा पराजय होत चालला. अशा समयीं प्रिटेंडर याच्या मु लग्यानें राज्य मिळवावयाचा निश्चय केला. चाल्र्स एड्वर्ड त्याचें नांव. तो शूर आणि साहसी होता; परंतु त्या मोठे कामास त्याची बुद्धि योग्य नव्हती. बहुत दिवस- पर्यंत मूर्ख, ढोंगी, आणि गरीब लोक त्याची खुशामत क रोत असत, लोकांचे सांगण्यावरून त्यास असे वाटले होतें की, सर्व राज्य बंड करावयास सिद्ध झाले आहे; कारण कीं, राज्यांत जे नवे नवे मोठे कर बसविले होते, ते लो-