पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५७ त- तयार केलें; व त्यांनीं प्रिंटेंडर याचे मुलाचे समक्ष इंग्लंड देशाजवळचे बंदरी गलबतावर चढावें असें योजिलें. साच बेत केला होता कीं, ड्युक रोक्सैल यानें मोठी ग लवतें वीस घेऊन त्या फौजेस इंग्लंड देशांत पोंचवावें; आणि ती जमिनीवर उतरली ह्मणजे तिचा सरदारपणा कौंट साक्स याने करावा; परंतु इंग्लिश यांचा सरदार सर जान नारिस त्यापेक्षा मोठें अरभार घेऊन आला, तेणेंकरून हा सर्व उद्योग फुकट गेला. ह्मणून फ्रेंच यांनी आपलीं गलवतें मागें फिरविलीं; व त्यांची भाड्या- चीं गलबतें उलटा वारा लागल्यामुळे फार खराब झालीं; या रीतीनें अकस्मात येऊन नाश करावयाची मसलत फस- ल्यावर फ्रेंच यांनी इंग्लिश लोकांशीं उघड युद्धाची प्रतिज्ञा केली. मग फ्रेंच लोकांनी मोठ्या हुशारीनें युद्धाचा प्रारंभ केला. त्यांनी फ्रिवर्ग शहरास वेढा घातला; आणि ढल्या लढाईचे प्रारंभी टूर्ने ह्मणून जे बळकट शहर आहे, त्यासही वेढा घातला. इंग्लिश व त्यांचे साथी यांची फौज थोडी होती; परंतु त्यांनी एक लढाई करून शहर राखावें, असा निश्चय केला; ह्मणून ते शत्रूवर चढून गेले, आणि एके उंच स्थळावर फ्रेंच यांनीं तळ दिला होता, त्याचे- जवळ ते राहिले. सेंटआंतोन या नांवाचें गांव उजवे बाजूस, एक अरण्य डावे बाजूस, आणि फांतिनाय शहर पुढे, अशी त्यांस जागा मिळाली; ह्मणून इंग्लिश यांची हिंमत कमी झाली नाही. त्यांनी सुमारे दीड प्रहर रात्र असता त्यांवर हल्ला केला, आणि पराक्रमेकरून त्यांस फार हैराण केलें. या रीतीने सुमारे दोन घटिका पावेतों इं-