पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्याची फौज पांच चार कोश गेली, इतक्यांत त्यांनीं डेटि गेन गांवाजवळ पाहिले की, शत्रूनों चारही बाजूंनी वेढा दिला. त्या वेळेस पुढे फार संकटाची गोष्ट आली, असे दिसूं लागले; तें असें कीं, जर शत्रूशीं लडाई केली तर आप- ला फार नाश होईल. जर उगेंच निरुद्योगी राहिलें, तर अन्नासाठीं हाल होऊन प्राण जातील; आणि सर्वांस निघून जाण्यास वाट तर मिळेना. अशा विचारांत राजा पडला असतां, फ्रेंच याचे उतावीळपणामुळे त्याचे सर्व सैन्याचे संरक्षण झालें. एक अरूंद स्थळ होतें, ते त्यांनी राखून राहावयाचें होतें, तें सोडून ते त्याचे आलीकडे आले; आणि ड्युक ग्रामोंट याने घोडेस्वारानिशीं इंग्लि- श यांचे पायदळावर मोठ्या आवेशाने हल्ला केला. इंग्लि- श लोकानींही तो हला शौर्य आणि दृढनिश्चय यांहीं- करून साहिला; ह्मणून फ्रेंच यांची दुर्दशा होऊन ते त्वरेनें मेन नदी उतरून परत गेले. या उद्योगांत फ्रेंच यांचे पांच हजार लोक पडले. त्या वेळेस फ्रेंच लोकांनी सर्व ठिकाणी मोठा उद्योग चालविला होता. त्यांनी इंग्लंड देशावर हल्ला करावया- ची मसलत योजिली; आणि पूर्वीचा प्रिटेंडर याचा मु लगा चार्ल्स, रूम शहराहून स्पानिश जासुदाचा वेष घेऊन पारीस शहरास आला. तेथे त्यांची आणि फ्रेंच राजाची भेट झाली. या चार्लस याचे कुटुंबास फार दिवसांपासून फ्रेंच सरकाराने मदत करण्याचे वचन दिलें होते; परंतु आता असे दिसले कीं, ते वास्तविक त्यास मदत करणार. त्या लढाईसाठी त्यांनी पंध्रा हजार पायदळ